टोयोटा कंपनीचे उच्च अधिकारी आणि जिल्हाधिकारी यांची भेट शिक्षण, आरोग्य आणि सौर ऊर्जा निर्मिती साठी एकत्र काम करणार -जिल्हाधिकारी दिलीप स्वामी

टोयोटा कंपनीचे उच्च अधिकारी आणि जिल्हाधिकारी यांची भेट शिक्षण, आरोग्य आणि सौर ऊर्जा निर्मिती साठी एकत्र काम करणार -जिल्हाधिकारी दिलीप स्वामी छत्रपती संभाजीनगर, दि.२८ (जिमाका)-जिल्ह्यामध्ये सामाजिक आणि शैक्षणिक क्षेत्रात टोयाटो कंपनी आपल्या सामाजिक उत्तरदायित्व निधीतून अंगणवाडी , शाळा पायाभूत सुविधा ,सौर ऊर्जा आणि कचरा व्यवस्थापन या क्षेत्रात जिल्हा प्रशासनासोबत काम करण्यास तयार असल्याचा आज झालेल्या बैठकीत निर्णय झाला. टोयाटो कंपनीचे देशाचे मुख्य कार्यकारी उपाध्यक्ष सुदीप गुलाटी यांनी आज जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हाधिकारी दिलीप स्वामी आणि जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विकास मीना यांची भेट घेऊन चर्चा केली. जिल्ह्यातील विविध विकास कामांमध्ये टोयाटो कंपनीच्या सामाजिक उत्तरदायित्व निधीतून विकासात्मक काम करण्यासाठी तयारी दर्शवली आहे. यासाठी जिल्हा प्रशासनाच्या मार्फत लोकाभिमुख सुविधा उपलब्ध करण्याबाबत चर्चा झाली. शिक्षण, आरोग्य, सौर ऊर्जा याक्षेत्रात हा सहभाग असेल. टोयाटोचे कार्यकारी उपाध्यक्ष सुदीप दळवी म्हणाले की, कौशल्य आधारित रोजगाराच्या संधी उपलब्धतेसाठी शिक्षण आणि तंत्रज्ञानाबरोबरच कौशल्यपूर्ण मनुष्यबळ उपलब्ध व्हावे यासाठी शिक्षणा आणि तांत्रिक शिक्षण यावर काम करीत आहे. व्यक्तीच्या जीवनामध्ये मूलभूत बदल करण्यामध्ये टोयाटो कंपनी जिल्हा प्रशासनासोबत काम करण्यासाठी उत्सुक आहे. आवश्यकतेनुसार सर्वतोपरी सहकार्य कंपनीमार्फत करण्यात येईल. जिल्हाप्रशासनातर्फे एकत्र काम करण्यासाठी येणाऱ्या सर्व परवानगी यामध्ये सहकार्य देण्याची ग्वाही दिली. सामाजिक सेवेचे दायित्व हे खऱ्या अर्थाने जिल्हा प्रशासनासोबत काम करून गरजवंत व्यक्तींचे जीवन बदल करण्यामध्ये होणार असल्याचे समाधान यावेळी टोयाटो कंपनीचे मुख्य संपर्क अधिकारी सुदीप दळवी यांनी व्यक्त केले.

Jan 28, 2025 - 22:53
Jan 28, 2025 - 22:56
 0
Toyota Company High Officer Aani District Magistrate Yanchi Bhet  Teaching, Arogya Aani Solar Energy Made Sathi Collect work  Chhatrapati Sambhajinagar, D.26 (Jimaka)-Jilhayamadhye socially academic field to Toyo company Aaplya Social Responsibility Nidhitun Anganwadi, Shakti Anganwadi, Solar Energy Molery Garbage Arrangement or Kshetra Sanskriti, Jeevasanasanasok Karanyacis  Toyato Company, Deshche Chief Executive Vice President Sudeep Gulati Yani today, District Officer Dilip Swami Aani Jilaha
Toyota Company High Officer Aani District Magistrate Yanchi Bhet Teaching, Arogya Aani Solar Energy Made Sathi Collect work Chhatrapati Sambhajinagar, D.26 (Jimaka)-Jilhayamadhye socially academic field to Toyo company Aaplya Social Responsibility Nidhi
1 / 1

1. Toyota Company High Officer Aani District Magistrate Yanchi Bhet Teaching, Arogya Aani Solar Energy Made Sathi Collect work Chhatrapati Sambhajinagar, D.26 (Jimaka)-Jilhayamadhye socially academic field to Toyo company Aaplya Social Responsibility Nidhitun Anganwadi, Shakti Anganwadi, Solar Energy Molery Garbage Arrangement or Kshetra Sanskriti, Jeevasanasanasok Karanyacis Toyato Company, Deshche Chief Executive Vice President Sudeep Gulati Yani today, District Officer Dilip Swami Aani Jilaha

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow