कन्नड राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी तालुका अध्यक्षपदी प्रकाश रामभाऊ गाडेकर पाटिल यांची निवड अजित। अभिनंदन केले.
कन्नड राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी तालुका अध्यक्षपदी प्रकाश रामभाऊ गाडेकर पाटिल यांची निवड अजित पवारांनी दखल घेऊन मुजीब खान कन्नड प्रतिनिधी : - राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हा अध्यक्ष यांनी काही दिवसापूर्वी तालुक्यातील कार्यकर्त्यांना विश्वासात न घेता,व कोणतेही कल्पना न देता मनमानीपणे कैलास अकोलकर यांना तालुका अध्यक्ष पदी नियुक्ती बाबत पत्र दिलं होते. हे पत्र प्रसिद्ध होताच प्रकाश गाडेकर यांनी याबाबत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष तथा उपमुख्यमंत्री अजित पवार,प्रदेश अध्यक्ष सुनील तटकरे यांच्याकडे याबाबत दाद मागितली होती, अजित पवारांनी अन्यायाची दखल घेऊन प्रकाश गाडेकर यांची राष्ट्रवादी काँग्रेसच्या तालुका अध्यक्षपदी नियुक्ती कायम ठेवण्याचे आदेश दिले. प्रदेश सरचिटणीस शिवाजीराव गर्जे यांनी त्याची अंमलबजावणी करत तात्काळ पत्र काढून जिल्हा कार्यकारणीला निर्देश दिले. नियुक्ती कायम ठेवल्याने जिल्ह्यातील पदाधिकार्यांनी प्रकाश गाडेकर यांचे अभिनंदन केले.

1. कन्नड राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी तालुका अध्यक्षपदी प्रकाश रामभाऊ गाडेकर पाटिल यांची निवड अजित। अभिनंदन केले.
What's Your Reaction?






