पोलीस कॉलनी, छत्रपती संभाजी नगर येथील सातव्या मजल्यावरून एक इसम जीव देण्याचा इराद्याने उडी मार
पोलीस कॉलनी मिल कॉर्नर, छत्रपती संभाजी नगर येथील सातव्या मजल्यावरून एक इसम जीव देण्याचा इराद्याने उडी मारण्यासाठी बसला होता. सदरची बाब ही तेथे कपडे वाळवण्यासाठी आलेल्या महिला पोलीस कर्मचारी शबाना बेग व त्यांचा मुलगा रेहान बेग यांच्या निदर्शनास आली. तेव्हा शबाना बेग व रेहान यांनी त्या इसमास बोलण्यामध्ये गुंतवले व लोकांना बोलावले तेवढ्यात पोलीस कॉलनीतील पोलीस तेथे आले व त्या विश्वास त्यांनी वर ओढून घेतले. महिला कर्मचारी शबाना बेग व त्यांचा मुलगा रेहान अनिस बेग यांच्या समय सुचकतेमुळे त्या इसमाचे प्राण वाचले त्याबद्दल सर्वत्र त्या माय लेकांचे कौतुक होत आहे ..........
What's Your Reaction?






