टाकळी रा. रा.येथील भागडे वस्तीला नवीन मिनी अंगणवाडी इमारत मंजुरी बाबत व जि.प.प्रशाला टाकळी रा.रा. या शाळेला दत्तक घेऊन विद्यार्थ्यांसाठी ड्यूएल
टाकळी रा. रा.येथील भागडे वस्तीला नवीन मिनी अंगणवाडी इमारत मंजुरी बाबत व जि.प.प्रशाला टाकळी रा.रा. या शाळेला दत्तक घेऊन विद्यार्थ्यांसाठी ड्यूएल डेक्स ,बायोमेट्रिक्स हजरी मशीन व संगणक कक्ष निधीमधून मागणीचे मा.आमदार साहेब यांना गावकऱ्यांचे निवेदन.*. मौजे टाकळी रा.रा. गावापासून अंदाजे दोन किमी अंतरावर भागडे वस्ती येथे सध्या उघड्यावर अंगणवाडी भरते अंगणवाडी मंजुरीसाठी चा प्रस्ताव दि. 29 .11 .2023 ला मा.गट विकास अधिकारी पंचायत समिती खुलताबाद यांना दिलेला आहे परंतु आतापर्यंत अंगणवाडी इमारत मंजूर न झाल्याने माननीय आमदार प्रशांत बंब साहेब यांच्या निधीमधून अंगणवाडी इमारत मंजुरी मिळावी म्हणून निवेदन देऊन संजय जाधव शालेय व्यवस्थापन समितीचे सदस्य सामाजिक कार्यकर्ते वृद्ध कलावंत यांनी मा.आमदार साहेबांसोबत चर्चा करून निवेदन दिले. तसेच जि.प.प्रशाला टाकळी रा.रा. या शाळेला दत्तक घेऊन शाळेच्या विद्यार्थ्यांना बसण्यासाठी ड्युएल डेस्क, आधुनिक शिक्षणासाठी संगणक कक्ष आणि शिक्षकांच्या बायोमेट्रिक हजेरी साठी हजरी मशीन शाळेत व्यवस्थापन समितीचे घेतलेल्या ठरावासह निवेदन दिले. निवेदनावर व्यवस्थापन समितीचे सदस्य सामाजिक कार्यकर्ते बुद्ध कलावंत संजय जाधव, सकाहारी वद्रे, दादासाहेब भागडे व मोहन गोलवाड यांच्या स्वाक्षऱ्या आहेत.

1. टाकळी रा. रा.येथील भागडे वस्तीला नवीन मिनी अंगणवाडी इमारत मंजुरी बाबत व जि.प.प्रशाला टाकळी रा.रा. या शाळेला दत्तक घेऊन विद्यार्थ्यांसाठी ड्यूएल
What's Your Reaction?






