समाधान वाणी यांना राज्यस्तरीय दर्पण पुरस्कार जाहीर
समाधान वाणी यांना राज्यस्तरीय दर्पण पुरस्कार जाहीर छत्रपती संभाजीनगर( औरंगाबाद) : येथील गेल्या बारा वर्षापासून पत्रकारितेच्या माध्यमातून सर्वसामान्यांना न्याय देण्याचे कार्य केले. अन्याय-अत्याचार, शैक्षणिक, सामाजिक क्षेत्रासह विविध क्षेत्रात कार्य करणाNया व्यक्तींच्या कार्याची दखल घेतलेली आहे. त्याचप्रमाणे त्यांनी आपल्या लेखणीच्या माध्यमातून स्पर्धा परीक्षेत उत्तीर्ण होणाNया मुला-मुलींची यशेगाथा घेऊन लेखनीच्या माध्यमातून अनेकांना प्रेरित करण्याचे कार्यही केले. समाधान वाणी यांनी अजिंक्य केसरी व सत्यशोधक दर्पणच्या माध्यमातून आपल्या पत्रकारितेला सुरुवात केली आहे. त्यांच्या या कार्याची दखल घेऊन एकता बहुउद्देशीय सामाजिक संस्थेच्यावतीने होणाNया ‘एकता सन्मान संमेलन’मध्ये ६ जानेवारी रोजी महाराजा श्री अग्रेसन भवन, व्दारका, नाशिक येथे संपन्न होणार आहे. या संमेलनामध्ये समाधान वाणी यांच्या पत्रकारितेसाठी ‘राज्यस्तरीय दर्पण पुरस्कार’ प्रदान करण्यात येणार आहे. या संमेलनाचे अध्यक्ष मनोज पिंगळेकर असून प्रमुख पाहुणे श्री. दादा भुसे वॅâबिनेट मंत्री, खा.नरेश मस्के, ठाणे, मानिकराव कोकाटे, कॅबिनेट मंत्री, खा. राजुभाऊ वाजे, नाशिक, रवींद्र नेरकर वैभव आत्रम, संजय यादव, ज्योती ठाकूर, सुखदेव भालेराव आदी मान्यवरांच्या हस्ते हा पुरस्कार देण्यात येणार आहे. तरी या राज्यस्तरीय पुरस्कार जाहीर झाल्याबद्दल समाधान वाणी यांचे विविध मान्यवरांनी शुभेच्छांचा वर्षाव करत अभिनंदन केले आहे.

1.
What's Your Reaction?






