आजुबाई शिक्षण संस्थेत तर्फे क्रीडा स्पर्धा आयोजित करण्यात आली

आजुबाई शिक्षण संस्थेत तर्फे क्रीडा स्पर्धा आयोजित करण्यात आली मुजीब खान कन्नड प्रतिनिधी : मंगळवार दिनांक ३१ डिसेंबर२०२४ रोजी आजुबाई शिक्षण संस्थेत, शाश्वत बहुद्देशीय सेवाभावी संस्था संचलित, नेहरू युवा केंद्र, छत्रपती संभाजीनगर, तर्फे तालुकास्तरीय क्रीडा स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. या तालुकास्तरीय क्रीडा स्पर्धे साठी प्रमुख पाहुणे म्हणून मा. . सानप , पोलीस निरीक्षक, कन्नड उपस्थित होते, तसेच तालुकास्तरीय क्रीडा स्पर्धेचे उद्घाटन आजुबाई शिक्षण संस्थेच्या संचालिका वंदना देशमुख मॅडम यांच्या हस्ते करण्यात आले. या तसेच या तालुकास्तरीय क्रीडा स्पर्धेत कन्नड शहरातील संत ज्ञानेश्वर विद्यालय, आजुबाई माध्यमिक विद्यालय, काशीनाथराव पाटील विद्यालय कर्मवीर काकासाहेब देशमुख उच्च माध्यमिक विद्यालय, सूर्योदय माध्यमिक विद्यालय सहभागी झाले होते, या स्पर्धेत आजुबाई शिक्षण संस्थेचे कर्मवीर काकासाहेब देशमुख उच्च माध्यमिक विद्यालय हिराईनगर च्या मुलांच्या संघाने कबड्डी खेळात प्रथम क्रमांक पटकावला , तसेच आजुबाई माध्यमिक विद्यालयातील मुलींनी खो-खो खेळात प्रथम क्रमांक पटकावला. सर्व विजयी खेळाडूंना प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते पारितोषिक देण्यात आले व आजुबाई शिक्षण संस्थेचे संस्थापक अध्यक्ष सुधाकर देवकर सर, संचालिका वंदना देशमुख मॅडम, मा. अतुल धाटबळे सर, सचिव शाश्वत सेवाभावी संस्था, चापानेर ता. कन्नड, अविनाश काळे सर क्रीडाधिकारी कन्नड तालुका, गोसावी सर, पांडव सर व विद्यालयातील सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी वि द्यार्थी उपस्थित होते.

Jan 2, 2025 - 20:32
 0
1 / 3

1.

शाळांना वेळेचे बंधन आहे कुठे ?

मुजीब खान कन्नड

------------------------------------

शासनाने शाळा सकाळी नऊ वाजे नंतर भराव्या असे स्पष्ट निर्देश दिले परंतु जिल्ह्यात अनेक शाळा अजूनही सकाळी सात वाजताच भरत असल्याचे दिसून येते सकाळी लवकर शाळा भरल्यामुळे मुलांना सहा वाजताच उठावे लागते त्यामुळे मुलांची झोप पूर्ण होत नाही परिणामी अनेक मुले शाळेत झोपतात त्याचा विद्यार्थ्यांच्या आरोग्यावर त्यांच्या विकासावर नकारात्मक परिणाम होऊ शकतो शाळा सकाळी उशिरा सुरू होण्यामागील शासनाचे वेगळे उद्दिष्ट आहे ते म्हणजे विद्यार्थ्यांना पुरेशी विश्रांती मिळावी त्यांचे मानसिक आणि शरीरिक आरोग्य चांगले राहावे थंड हवामानाच्या परिस्थितीत होणाऱ्या त्रासांपासून त्यांना दूर ठेवावे थंडीत लहान मुलांना सकाळी लवकर उठणे केवळ असुविधाजनक नसते तर ते आरोग्यासाठी हानिकारक ठरू शकते थंडीच्या दिवसात शरीराला जास्त ऊब आणि विश्रांतीची गरज असते मुलांना सकाळी लवकर उठवली की त्यांच्या झोपेच्या तासांमध्ये व्यत्यय येतो ज्यामुळे थकवा चिडचिडेपणा आणि एकाग्रतेचा अभाव जाणवतो तसे झोप पूर्ण न झाल्यामुळे त्यांचे शरीरिक आरोग्य खालावते प्रतिकारशक्ती कमजोर होते सर्दी खोकल्यासारखा आजाराचा त्रास होऊ शकतो शासनाच्या आदेशाचा भंग करणाऱ्या शाळांनी याविषयीची गांभीर्याने दखल घ्यायला हवी सध्याच्या शिक्षणा प्रणालीत विद्यार्थ्यांवर अभ्यासाचा मोठा ताण असतो त्यामुळे झोप आणि विश्रांती ही त्यांच्या आरोग्यासाठी महत्त्वाची आहे थंडीच्या काळात विशेषत ग्रामीण भागात सकाळी लवकर शाळेत जाण्यासाठी लहान मुलांना अनेक अडचणींचा सामना करावा लागतो अंधार थंड वारा आणि शीतलहरी मुळे त्यांचा प्रवास कष्टदाय होतो यामुळे शाळेत पोचल्यावर त्यांना अभ्यासावर लक्ष केंद्रित करणे कठीण होते. मुलांचे आरोग्यासाठी आणि शिक्षणासाठी अनुकूल वातावरण तयार करणे ही प्रत्येक शाळेची जबाबदारी आहे शासनाच्या वेळेच्या निर्णयांचे पालन करणे केवळ शाळांसाठी बंधनकारक नाही तर विद्यार्थ्यांच्या भल्यासाठी आवश्यक आहे मुलांच्या आरोग्याचा आणि त्याच्या उज्वल भविष्यासाठी त्यांच्या शाळा वेळेच्या बाबतीत संवेदनशील होण्याची गरज आहे यामुळे शाळा प्रशासनाने शासनाचे आदेश पाळून मुलांना आरोग्यदायी आणि सुकर शैक्षणिक वातावरण प्रदान करायला हवे मात्र सध्या तरी शहरातील अनेक शाळा या नियमांची पायमल्ली करत सकाळी सात वाजता मुलांना शाळेत बोलावत आहे शाळेची वेळ ही नऊ नंतर करावी या व शिक्षण विभागाने अनेक वेळा परिपत्रक काढले पण या पत्राकडे अनेक शाळांनी दुर्लक्ष केले आहे त्यामुळे शिक्षण विभागाने ठोस अशी कारवाई करण्याची गरज आहे नाहीतर शाळेच्या वेळा पाळताना विद्यार्थ्यांचे झोपेचे गणित बिघडत आहे त्याचा परिणाम भविष्यात विद्यार्थ्यांना भोगाव लागण्याची शक्यता नाकारता येत नाही

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow