आझाद अली शाह कॅम्पस मध्ये प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा
आझाद अली शिक्षण संस्थेद्वारे दौलताबाद येथे संचलित शायनिंग स्टार मराठी व इंग्रजी प्राथमिक आणि एमजीएम वस्तानवी उर्दु प्राथमिक व माध्यमिक शाळेत प्रजासत्ताक दिन अत्यंत आनंदमय वातावरणात व उत्साहात साजरा करण्यात आला. सकाळी 8 वाजता विद्यार्थ्यांची जयघोष आणि लेझीमच्या तालात प्रभात फेरी काढण्यात आली. 9 :00 वाजता भारतीय राष्ट्रीय काँग्रेस माजी सरचिटणीस तथा शिक्षण क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणारे ज्येष्ठ नेते प्रकाश मुगदिया यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आला, यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष सुप्रसिद्ध उच्च न्यायालयाचे वकिल ज्येष्ठ विधीतज्ञ तथा नावाजलेले वक्ते, कवी, लेखक तथा कलाकार डॉ. राजेंद्र गोडबोले हे होते तर आझाद एनजीओ च्या अध्यक्ष सैय्यद फैमुन, शायनिंग स्टार शाळेचे मुख्याध्यापक साजिद पाशा उर्दू प्राथमिक शाळेच्या मुख्याध्यापिका अमरीन खान व माध्यमिक शाळेचे मुख्याध्यापक शेख जाकीरया इतर शिक्षक उपस्थित होते. यावेळी शाळेतील सहशिक्षक शेख आरीफ यांनी पाहुण्यांचा परिचय करून दिल्यानंतर आलेल्या पाहुण्यांचे शाल व पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले, त्यानंतर शाळेतील सहशिक्षिका सादिया पठाण यांनी संस्थेचा व शाळेचा परिचय करून दिला, त्यानंतर शाळेतील चिमुकल्यांनी भारतीय संविधान, राष्ट्रीय एकात्मता, संविधानाचे महत्व, महात्मा गांधी, मौलाना आझाद , सुखदेव, भगतसिंग ,स्वतंत्र्याचे महत्त्व ,राजगुरू अश्फाकुल्ला खान, नेताजी सुभाष चंद्र बोस ,खान अब्दुल गफार खान अशा विषयांवर भाषणे ,गीते ,शायरी सादर करून उपस्थित मान्यवर, पालक व श्रोत्यांना मंत्रमुग्ध केले व रोख स्वरूपात अनेक बक्षिसे मिळविली. त्यानंतर शाळेचे मुख्याध्यापक साजिद पाशा यांनी प्रास्ताविकामध्ये प्रजासत्ताक दिनाच्या सर्व उपस्थितांना शुभेच्छा देऊन शाळेविषयी व संस्थेविषयी संपूर्ण माहिती दिली व त्यानंतर संपूर्ण विद्यार्थ्यांना एकतेचा संदेश दिला, व , राष्ट्रीय एकात्मतेसाठी समाजतील चांगल्या लोकांचे आदर मानसन्मान करण्याचे सांगितले, त्यानंतर प्रकाश मुगदिया यांनी आपल्या मनोगतामध्ये चिमुकल्यांच्या कार्यक्रमातून शाळेचे संपूर्ण व्यवस्थापनाची आणि घेतल्या जाणाऱ्या मेहनतीची माहिती मिळते असे उद्गार काढले तर व शितावरून भाताची परीक्षा होते हे सांगीतले, कार्यक्रमाचे अध्यक्ष एडवोकेट डॉक्टर राजेंद्र गोडबोले यांनी आपल्या अध्यक्षीय भाषणात चिमुकल्यांनी सादर केलेल्या प्रत्येक कार्यक्रम मनमोहीत करणारे होते व पुन्हा पुन्हा पहावे आणि ऐकावेसे वाटत होते खरोखर आपण विद्यार्थ्यांवर जे संस्कार करत आहे ते अभिनंदन आहे असे सांगून शाळा , मुख्याध्यापक ,शिक्षक व सर्व विद्यार्थ्यांचे कौतुक केले. व मानसाची जात महत्त्वाची नसुन त्याच काम महत्त्वाचे आहे हे सांगुन मानवसेवा हि सुद्धा देशसेवा असल्याचे सांगून मुख्याध्यापक साजिद पाशा यांची भरपूर प्रशंसा व सुती करून शिक्षक व संस्थेचे कार्याबद्दल कौतुक केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शुभांगी कुलकर्णी व शेख फौजिया यांनी केले तर आभार प्रदर्शन निदा खान यांनी केले कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी खान मदिहा, वैष्णवी देहाडे , बुरहाना पठाण, आशा ढोकणे, शेख जिनत, धनश्री खिल्लारे , भक्ती बाळुबेटाळसे, सोनम सय्यद , शेख सुमैया, दिपाली धडे ,निलोफर शेख, नफिसा खाला, रिहाना खाला आदींनी परिश्रम घेतले व सर्व विद्यार्थ्यांना खाऊचे व फळे वाटप करून कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.

1. आझाद अली शाह कॅम्पस मध्ये प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा
What's Your Reaction?






