सेवा पंधरवडयात सर्वांनी सहभागी व्हावे - अतुल सावे बिबी का मकबरा येथे स्वच्छता ही सेवा अंतर्गत स्वच्छता अभियान
सेवा पंधरवडयात सर्वांनी सहभागी व्हावे - अतुल सावे बिबी का मकबरा येथे स्वच्छता ही सेवा अंतर्गत स्वच्छता अभियान छत्रपती संभाजीनगर, 25 सप्टेंबर 2025 भारत सरकारच्या माहिती आणि प्रसारण मंत्रालय, केंद्रीय संचार ब्यूरो, भारतीय पुरातत्व सर्वेक्षण, भारत पर्यटन, मेरा युवा भारत, शासकिय ज्ञान विज्ञान महाविद्यालय (राष्ट्रीय सेवा योजना) अणि ज्ञानेश्वरी विद्यालय, छत्रपती संभाजीनगर आदी संस्थान द्वारा बिबी का मकबरा, छत्रपती संभाजीनगर येथे स्वच्छता अभियानाचे आयोजन करण्यात आले होते. या प्रसंगी बोलताना महाराष्ट्र राज्याचे इतर मागास बहुजन कल्याण, दुग्धविकास, अपारंपारिक ऊर्जा व दिव्यांग कल्याण विभाग मंत्री, अतुल सावे यांनी सेवा पंधरवडयात सर्वांनी सहभागी व्हावे असे आवाहन केले. पुढे बोलताना ते म्हणाले आपल्या देशाचे लाडके पंतप्रधान नरेंद्र मोदी आपला वाढदिवस कुठल्याही प्रकारचा उत्सव साजरा न करता सेवा पंधरवडा म्हणून साजरा करतात. त्यामध्ये विशेष मोहिमे अंतर्गत देशभरामध्ये स्वच्छता अभियान, रक्तदान शिबिर, आरोग्य तपासणी असे समाजउपयोगी अभियान राबविले जातात. त्यातलाच एक भाग म्हणून आपल्या छत्रपती संभाजीनगर मध्ये स्वच्छता अभियान राबविण्यात येत आहे. यावेळी भारतीय पुरातत्व सर्वेक्षणचे अधीक्षण पुरातत्वविद, डॉ. शिवकुमार भगत, सहा. अधीक्षण पुरातत्वविद, प्रशांत सोनोने, संरक्षण अभियंता, हेमंत हुकारे, सहा. पुरातत्वविद, रजनीश कुमार, संरक्षण सहायक, संजय रोहनकर, केंद्रीय संचार ब्यूरोचे प्रबंधक, संतोष देशमुख, सहा. क्षेत्रीय प्रचार अधिकारी, प्रदीप पवार, भारत पर्यटनच्या पर्यटक माहिती अधिकारी, स्नेहन पाटील, ओम शिवबडे, कर्मचारी, अभिनव कुमार, विनायक राम, मेरा युवा भारत कार्यालयाच्या माजी जिला युवा अधिकारी, अरुणा कोचुरे, जिला युवा अधिकारी, मेघा सनवाल, कर्मचारी, प्रकाश त्रिभुवन, पंकज धुले, संतोष शिरसाठ, दत्तु शिरसाठ, शासकिय ज्ञान विज्ञान महाविद्यालय (राष्ट्रीय सेवा योजना)चे कार्यक्रम अधिकारी, डॉ. प्रितेश कालन, रामेश्वर पूरी, ज्ञानेश्वरी विद्यालय, छत्रपती संभाजीनगरचे शिक्षक व कर्मचारी आदी उपस्थित होते. बिबी का मकबरा, छत्रपती संभाजीनगरच्या पार्किंग परिसरामध्ये हे स्वच्छता अभियान राबविण्यात आले. कार्यक्रमाच्या यशस्विते करिता भारत सरकारच्या माहिती आणि प्रसारण मंत्रालय, केंद्रीय संचार ब्यूरो, भारतीय पुरातत्व सर्वेक्षण, भारत पर्यटन, मेरा युवा भारत अणि शासकिय ज्ञान विज्ञान महाविद्यालय (राष्ट्रीय सेवा योजना) अणि ज्ञानेश्वरी विद्यालय, छत्रपती संभाजीनगर आदी संस्थांचे अधिकारी, कर्मचारी, शिक्षक, विद्यार्थी आदींनी विशेष परिश्रम घेतले.
1. Service should be involved in the fortnight - Atul Save Cleanliness at Bibi Ka Maqbara is a cleanliness campaign under the service



What's Your Reaction?

