दि.०६ जानेवारी २०२५ पहिल्या सोमवारी मनपा लोकशाही दीन
दि.०६ जानेवारी २०२५ पहिल्या सोमवारी मनपा लोकशाही दीन छत्रपति संभाजीननगर दि.०२ जानेवारी (प्रतिनिधि) छत्रपती संभाजी नगर महानगरपालिका स्तरावरील लोकशाही दिन प्रत्येक महिन्याच्या पहिल्या सोमवारी राबविण्यात येतो. माहे जानेवारी २०२५ चा "महानगरपालिका लोकशाही दिन" सोमवार दि. ०६ जानेवारी २०२५ रोजी सकाळी १०.०० वाजता प्रशासकीय समिती कक्ष, मनपा मुख्य कार्यालय येथे मा.आयुक्त यांचे अध्यक्षतेखाली आयोजीत करण्यात येणार आहे. महाराष्ट्र शासनाच्या सामान्य प्रशासन विभागाकडून दिलेल्या सुधारीत परिपत्रकानुसार लोकशाही दिनाच्या १५ दिवस अगोदर दि.२३/१२/२०२४ पर्यंत विहीत नमुन्यात आवश्यक कागदपत्रासह अर्ज दिलेल्या नागरीकांनाच दि.०६ जानेवारी २०२५ रोजी समक्ष अर्ज सादर करण्याची परवानगी राहील, याची नोंद घ्यावी. ज्यांनी यापुर्वीच्या महानगरपालिका लोकशाही दिनात तक्रार अर्ज दिलेले असतील परंतु त्याच प्रकरणांत अद्याप कार्यवाही झाली नाही अशा प्रकरणात त्यांनी पुन्हा अर्ज देण्याची आवश्यकता नाही. असे उप आयुक्त-०६ तथा मुख्य समन्वयक लोकशाही दिन महानगरपालिका, छत्रपती संभाजीनगर लखीचंद चव्हाण यांनी कळविले आहे.
1.
What's Your Reaction?






