ॲड. कृष्णा पाटील जाधव यांना जीवन गौरव पुरस्कार जाहीर
ॲड. कृष्णा पाटील जाधव यांना जीवन गौरव पुरस्कार जाहीर मुजीब खान कन्नड (प्रतिनिधी) : कन्नड: पत्रकार सेवा संघ महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने दिला जाणारा २०२५ चा जीवन गौरव पुरस्कार कन्नड येथील सामाजिक कार्यकर्ते ॲड. कृष्णा पाटील जाधव यांना जाहीर झाला आहे. पत्रकार सेवा संघाच्या वतीने विविध क्षेत्रात उल्लेखनिय कार्य करणाऱ्या व्यक्तिमत्त्वा ला या पुरस्काराने सन्मानित करण्यात येते. दि. ०९ फेब्रुवारी रोजी लासुर स्टेशन येथे या पुरस्कार प्रदान कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. पुरस्कारार्थी ॲडव्होकेट कृष्णा पाटील जाधव हे कन्नड तालुका वकील संघाचे माजी अध्यक्ष आहेत तसेच विविध सहकार, सामाजिक, राजकिय पदां बरोबरच त्यांनी, हिराजीबाबा सहकारी साखर कारखाना, कन्नड सहकारी साखर कारखान्याचे संचालक पद ही भुषविले आहे. साखर कारखान्यांच्या खाजगीकरणा मुळे विस्थापित झालेले कामगार, भागधारक यांच्या साठी मोठा संघर्ष करुन न्याय हक्क मिळवून देण्यासाठी प्रयत्न केले आहेत. विश्वकर्मा नागरी सहकारी बँक शाखेचे चेअरमन म्हणून सध्या कामकाज बघतात. कृष्णा जाधव यांची फक्त सामाजिक कार्यातून ओळख मर्यादित न ठेवता, बँकिंग क्षेत्रातील आदर्श व्यक्तिमत्व म्हणुन जोपासले आहे. साहित्य कला संस्कृती संवर्धन क्षेत्रात ही ते सक्रिय आहेत. कन्नड तालुक्यात नवसाहित्यिक घडविण्यासाठी ते कार्यरत आहेत. त्यांच्या या कार्याची दखल घेत, यंदाचा महाराष्ट्र जीवन गौरव पुरस्कार त्यांना जाहीर झाला आहे. त्याबद्दल प्राचार्य डॉ. विजय भाषा , साहित्य, संस्कृती आणि संशोधन परिषदेचे कार्याध्यक्ष, तिफणकार डॉ. शिवाजी हुसे ,प्रविण दाभाडे, ज्ञानेश्वर गायके, संदीप ढाकणे, भिमराव सोनावणे, का का थोरात, संदीप वाकडे, सुरेश औटे, लक्ष्मण वाल्डे, अरुण थोरात, श्रीराम दापके, अनिता राठोड, शुभदा देवरे, गीतांजली गजबे, शिवनाथ गायकवाड आदिंनी अभिनंदन केले आहे.

1. ॲड. कृष्णा पाटील ऑर्केस्ट्रा याना जीवन गौरव पुरस्कार जहीर
What's Your Reaction?






