सुरक्षेच्या दृष्टीकोनातून बोअरवेल्स संदर्भात मार्गदर्शक सुचना जारी

सुरक्षेच्या दृष्टीकोनातून बोअरवेल्स संदर्भात मार्गदर्शक सुचना जारी छत्रपती संभाजीनगर, दि 7 (प्रतिनिधि )- संचालक आपत्ती व्यवस्थापन प्रभाग व राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन प्रतिसाद दलाच्या निर्देशानुसार बोअरवेल्स संदर्भात मार्गदर्शक सुचना जारी केल्या आहेत. यासाठी वरिष्ठ भूवैज्ञानिक, भूजल सर्व्हेक्षण विभाग यांना नोडल अधिकारी म्हणून नियुक्त केल्याचे आदेश जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांनी दिले आहेत. सदर आदेशात नमूद केले आहे की ,उघड्या बोअरवेल यांना अनिवार्यपणे सिल करणे, जेणेकरुन त्याठिकाणी जाण्यास मज्जाव होईल. यासाठी संबंधित जमीन मालक आणि ड्रिलिंग एजन्सी यांची जबाबदारी निश्चित करावी, सर्व बोअरवेल्स यांच्या नोंदणीची प्रणाली स्थापन करणे आवश्यक आहे. उघड्या बोअरवेल संबंधी असलेली जोखीम व लहान मुलांची सुरक्षा याबाबत व्यापक जनजागृती मोहिम राबविणे. बोअरवेल ऑपरेटर्स किंवा जमीन मालक यांनी बोअरवेलच्या सभोवताली सुरक्षेच्या अनुषंगाने अडथळे निर्माण करणे. असुरक्षित बोअरवेल ओळखण्यासाठी व त्यासंबंधी निराकरण करण्यासाठी समुदाय संचलित यंत्रणा कार्यान्वित करणे. सर्वोच्च न्यायालय यांनी जारी केल्याप्रमाणे बोअरवेल सुरक्षा नियमांचे उल्लंघन केल्यास संबंधिताकडून कठोर दंड आकारणी करण्यात्येनार आहे. सुरक्षा नियमांचे पालन होते किंवा कसे याबाबत खात्री करण्यासाठी संबंधित अधिकाऱ्यांची नियमित तपासणी करणेआवश्यक आहे. या आदेशाची अवज्ञा झाल्यास आपत्ती व्यवस्थापन अधिनियम 2005 चे कलम 51 अन्वये कोणतीही व्यक्ती संस्था, अथवा समूह यांचेवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल असे निवासी उपजिल्हाधिकारी तथा मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे विनोद खिरोळकर यांनी आदेशाद्वारे कळविले आहे.

Feb 8, 2025 - 22:09
 0

1.

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow

Er.M.A. Shakeel Senior Journalist,Social and Political activist Sportsman,Singer.District VicePresident Human Right Council of India.