सिल्कमिल कॉलनी येथे ४२ अनधिकृत नळ तोडले
सिल्कमिल कॉलनी येथे ४२ अनधिकृत नळ तोडले औरंगाबाद दि.२३ एप्रिल (प्रतिनिधि) सिल्कमिल कॉलनी येथे ४२ अनधिकृत नळ कनेक्शन खंडित करण्यात आले आहे. आज रोजी मा.आयुक्त तथा प्रशासक जी. श्रीकांत यांच्या आदेशानुसार व विशेष अनधिकृत नळ जोडणी शोध मोहीम पथकाचे प्रमुख अतिरिक्त आयुक्त तथा मुख्य लेखा व वित्त अधिकारी संतोष वाहूळे यांच्या मार्गदर्शनाखाली मोहल्ला उजाला डी.पी., मोईन-उल शाळेच्या बाजूला, सिल्क मिल कॉलनी येथे असलेल्या १५० मिमी मुख्य जलवाहिनी वर एकूण ४२ नळ खंडित करण्यात आले, सदरील ठिकाणी उप अभियंता एम.एम. चौधरी आणि विशेष पथकातील अभियंता रोहित इंगळे सोबत, कनिष्ठ अभियंता अमित पंडागळे तसेच अनधिकृत नळ शोध पथकाचे कर्मचारी वैभव भटकर, स्वप्निल पाईकडे, तमिज पठाण, तुषार पोटपिल्लेवार आणि सागर डीघोळे उपस्थित होते सदरील भागात नागरिकांना पाणी पुरवठा सुरळीत होत नव्हता या कारणास्तव कार्यकारी अभियंता किरण धांडे यांनी रोबोट कॅमेरा द्वारे पाहणी करण्याचे आदेश दिले असता असे निदर्शनास आले की फार प्रमाणात अनधिकृत नळ जोडण्या आहेत जेणेकरून शेवटच्या भागात पाणी पुरवठा होत नाही. म्हणून तातडीने ही मोहीम विना पोलिस बंदोबस्त घेता मनपाच्या नागरी सहाय्यक पथक यांच्या सहाय्याने घेण्यात आली.

1.
What's Your Reaction?






