प्रख्यात कवी अजीम नवाझ राही कन्नडकरांच्या भेटीला स्व.पी.डी.केवट गुरुजी यांच्या स्मृतिदिनानिमित्त उलगडणार कविचा प्रेरणादायी प्रवास
प्रख्यात कवी अजीम नवाझ राही कन्नडकरांच्या भेटीला स्व.पी.डी.केवट गुरुजी यांच्या स्मृतिदिनानिमित्त उलगडणार कविचा प्रेरणादायी प्रवास कन्नड |प्रतिनिधी ____________________________ स्वतःची एक वेगळी वहीवाट निर्माण करून एक कुल्फी विक्रेता ते महाराष्ट्रातील प्रख्यात नामवंत कवी असा प्रवास करणारे अजीम नवाज राही मंगळवार दी.११ रोजी कन्नडकरांच्या भेटीस येत आहे. शहरातील स्व.सौ.पूर्णाकाकू कोल्हे महिला प्रबोधिनी येथे स्व.पी. डी. केवट गुरुजी यांच्या स्मृतिदिनानिमित्त आयोजित कवितांचा स्फूर्तीदाई प्रवास यावर आयोजित व्याख्यान,मार्गदर्शन तथा अभिवादन कार्यक्रमास ते येत आहे. अजीम नवाज राही यांचा महाराष्ट्र राज्यशासनाच्या इयत्ता ९ वी,१०,वी,११ वी च्या पाठयपुस्तकात कवितांचा समावेश आहे.तसेच राज्यातील तब्बल विविध ११ विद्यापीठांच्या अभ्यासक्रमात त्यांच्या कविता संग्रहांचा समावेश करण्यात आलेला आहे. व्यवहाराचा काळा घोडा, कल्लोळातला एकांत,वर्तमानाचा वतनदार आणि तळमळीचा तळ आदी चार सकस,वस्तूनिष्ठ, खणखणीत कवितासंग्रह गाजलेले आहेत.राज्याच्या लेखणी आणि वाणी या दोन्ही क्षेत्रात आपला ठसा उमटवीला आहे.त्यांना अमेरिकेतील फॉउंडेशन, भारतातील केशव गोरे स्मारक ट्रस्ट मुंबई या साहित्य प्रांतातील अत्यंत प्रतिष्ठेचा महाराष्ट्र फाउंडेशन साहित्य पूरस्कार, महाराष्ट्र शासनाचा उत्कृष्ट बांगमय लेखणाचा कवी केशवसूत पुरस्कार यासह विविध ७० च्या वर मातब्बर पुरस्कार मिळालेले आहेत.सदर कार्यक्रम मंगळवार दि.११ रोजी शहरातील स्व.सौ पूर्णा काकू कोल्हे प्रबोधिनी येथे सायंकाळी साडे पाच वाजता असून अधिकाधिक नागरिक, शिक्षक,विद्यार्थी,पालक यांनी उपस्थित रहावे असे आवाहन आयोजकांच्या वतीने करण्यात आले आहे.

1. प्रख्यात कवी अजीम नवाझ राही कन्नडकरांच्या भेटीला स्व.पी.डी.केवट गुरुजी यांच्या स्मृतिदिनानिमित्त उलगडणार कविचा प्रेरणादायी प्रवास
What's Your Reaction?






