प्रत्येक अपघात टाळता येतो- डॉ. विनयकुमार राठोड
प्रत्येक अपघात टाळता येतो- डॉ. विनयकुमार राठोड प्रत्येक अपघात हा थोड्याशा खबरदारीने, काळजीने, उपाययोजनांनी टाळता येऊ शकतो. केवळ हलगर्जीपणा, अतिआत्मविश्वास, अनाठायी धाडस यामुळेच अपघात होत असतात. प्रत्येकाने खबरदारी बाळगली तर प्रत्येक अपघात टाळता येऊ शकतो,असे प्रतिपादन पोलीस अधीक्षक डॉ. विनयकुमार राठोड यांनी केले. प्रास्ताविकात विजय काठोळे म्हणाले की, आपल्या जिल्ह्यात गेल्या वर्षभरात ६७० मृत्यू हे रस्ते अपघातात झाले आहेत. हे सर्व मृत्यू आपण टाळू शकलो असतो. केवळ हेल्मेट न वापरल्याने त्यातील अनेक मृत्यू झाले आहेत. ‘परवाह अर्थात केअर’, असे या वर्षीच्या अभियानाचे ब्रीद वाक्य आहे,असे त्यांनी सांगितले. रुपाली दरेकर, डॉ. देशमुख यांनीही यावेळी आपले मनोगत व्यक्त केले. उपस्थित मान्यवरांच्या हस्ते माहिती पत्रकाचे प्रकाशन करण्यात आले तसेच प्रबोधनपर चित्रफितींचे प्रदर्शनही करण्यात आले. सविता पवार यांनी सूत्रसंचालन केले. विद्यार्थी युवक युवतींची उपस्थिती मोठ्या संख्येने होती.

1.
What's Your Reaction?






