ड्रोन व तत्सम उड्डाणांना मनाई

ड्रोन व तत्सम उड्डाणांना मनाई छत्रपती संभाजीनगर, (औरंगाबाद)दि.२७ (प्रतिनिधि):- कायदा व सुव्यवस्था अबाधित रहावी यासाठी पोलीस आयुक्तालय कार्यक्षेत्रात ड्रोन, रिमोट कंट्रोल्ड मायक्रोलाईट एअरक्राफ्ट, पॅराग्लायडर, पॅरा मोटर्स, हॅण्ड ग्लायडर्स, हॉट एअर बलून इ. च्या उड्डाण क्रियांना भारतीय नागरीक सुरक्षा संहिता २०२३ च्या कलम १६३ अन्वये मनाई करण्यात आली असल्याचे आदेश पोलीस आयुक्त प्रविण पवार यांनी निर्गमित केला आहे. हे आदेश दि.३१ डिसेंबर २०२४ ते २८ फेब्रुवारी २०२५ या कालावधीत लागू राहतील छत्रपती संभाजीनगर पोलिसांकडून हवाई पाळत ठेवणे किंवा पोलीस आयुक्त छत्रपती संभाजीनगर यांच्या लेखी विशिष्ट परवानगीने कर ण्यात येणाऱ्या कारवाई यास अपवाद असेल.या आदेशाचे उल्लंघन केल्यास भारतीय न्याय संहिता २०२३ च्या कलम २२३ अन्वये कायदेशीर कारवाई करण्यात येईल,असेही आदेशात स्पष्ट करण्यात आले आहे.

Dec 28, 2024 - 03:37
 0
1 / 1

1.

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow

Er.M.A. Shakeel Senior Journalist,Social and Political activist Sportsman,Singer.District VicePresident Human Right Council of India.