वाहतुकीस अडथळा निर्माण करणाऱ्या चारचाकी वाहनांची जप्ती कारवाई

वाहतुकीस अडथळा निर्माण करणाऱ्या चारचाकी वाहनांची जप्ती कारवाई औरंगाबाद छत्रपति संभाजीननगर दि.२७ डिसेंबर (प्रतिनिधि) छत्रपती संभाजी नगर महानगरपालिका आणि शहर वाहतूक पोलिस यांच्या संयुक्त कारवाई ने शहरातील गजबजलेल्या भागातून रहदारीस अडथळा निर्माण करणाऱ्या चारचाकी वाहनांची जप्ती कारवाई करण्यात येत आहे. रोषण गेट ते आझाद चौक व कटकट गेट ते एस.पी बंगला या रस्त्यावरील दुभाजकाला खेटून वाहतुकीस अडथळा निर्माण होईल असे चारचाकी व तीन चाकी वाहने अवैध रित्या उभे करण्यात आले होते.मां.आयुक्त महोदय यांच्या ही बाब निदर्शनास आल्यानंतर त्यांनी सदरील वाहने जप्त करण्याचे आदेश दिले होते. या अनुषंगाने सदर कारवाई मां.आयुक्त तथा प्रशासक जी श्रीकांत यांच्या आदेशानुसार व अतिरिक्त आयुक्त तथा अतिक्रमण विभाग प्रमुख संतोष वाहुळे यांच्या मार्गदर्शनाखाली महानगरपालिकेच्या माजी सैनिक पथक प्रमुख प्रमोद जाधव यांच्या नेतृत्वात माजी सैनिक वॉर्डन पथक व शहर वाहतूक पोलिस यांच्या संयुक्त पथकाने एकूण तीन चाकी व चारचाकी २५ वाहने जप्त करून गरवारे क्रीडा संकुल येथे जमा करण्यात आले आहेत. सदरील कारवाई या पुढेही या प्रकारे सुरू राहणार असून ज्या नागरिकांनी रहदारीस अडथळा निर्माण होईल असे वाहने रस्त्यावर उभे केले असतील अशी वाहने तत्काळ काढून घ्यावी अन्यथा मनपा प्रशासन वाहने जप्त करताना जर काही नुकसान झाले तर त्यास जबाबदार राहणार नाही असे प्रशासनाच्या वतीने कळविण्यात आले आहे.

Dec 28, 2024 - 00:36
 0

1.

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow

Er.M.A. Shakeel Senior Journalist,Social and Political activist Sportsman,Singer.District VicePresident Human Right Council of India.