महानगरपालिका कडून आरोग्य केंद्र नेहरूनगर येथे धडक मोहीम सुरुवात.
महानगरपालिका कडून आरोग्य केंद्र नेहरूनगर येथे धडक मोहीम सुरुवात. अवकाळी व मान्सूनपूर्व पावसामुळे साथरोग व कीटकनाशार फैलावाचा मोठा धोका असतो त्यामुळे महानगरपालिकेकडून आरोग्य विभागामार्फत शुक्रवार दिनांक 30 5 2025 पासून आरोग्य केंद्र नेहरू नगर येथून धडक अबेट मोहीम सुरुवात करण्यात आली. नेहरूनगर, शहा बाजार, गणेश कॉलनी आरोग्य केंद्रांतर्गत विविध भागात घरोघरी जाऊन सर्वेक्षण करत कार्यक्षेत्रात अबेट ट्रीटमेंट, औषध फवारणी, एम एल औ ऑईल टाकणे, स्टिकर्स लावणे, हस्त पत्रक वाटप करणे, कंटेनर सर्वेक्षण इ. कार्य व डास प्रतिबंधात्मक उपाय करण्यात आले. आरोग्य केंद्र नेहरूनगर आरोग्य केंद्र शहा बाजार आरोग्य केंद्र गणेश कॉलनी यांच्या संयुक्त विद्यमानातून आरोग्य विभागामार्फत अतिजोखमाच्या भागात हि मोहीम राबविण्यात येणार आहे. हि मोहीम मा. वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ.पारस मंडलेचा यांच्या आदेशाने आज नेहरूनगर इथे सुरुवात श्री.इसाक हाजी (सभापती तथा नगरसेवक) डॉ. तलत काझी (आरोग्य अधिकारी गणेश कॉलनी ) डॉ. समीरा नुसरत (आरोग्य अधिकारी नेहरूनगर) डॉ. वैशाली बावस्कर (आरोग्य अधिकारी शाहा बाजार)श्री.विनोद हिवाळे पर्यवेक्षक झोन.क्रमांक तीन इन्चार्ज सिस्टर श्रीमती. साठे सिस्टर, फार्मसी ऑफिसर सिस्टर,RC, HA,MPW अटेंडेंट व आशा वर्कर मलेरिया कर्मचारी उपस्थित होते. सूत्रसंचालन श्री. संतोष तायडे (प्रयोगशाळा अधिकारी) यांनी केले. हि मोहीम अति जोखीम भागात एकूण 110 कर्मचारी यांच्या माध्यमातून राबवण्यात आली.

1.
What's Your Reaction?






