मधमाशी पालकांना मधुक्रांती पोर्टलवर नोंदणी करण्याचे आवाहन

मधमाशी पालकांना मधुक्रांती पोर्टलवर नोंदणी करण्याचे आवाहन छत्रपती संभाजीनगर,दि.२७(जिमाका):- कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्रालयाद्वारे राष्ट्रीय मधुमक्षिका मंडळ, नवी दिल्ली अंतर्गत मध आणि मधमाशी संबंधित अन्य उत्पादनांच्या योग्य स्त्रोताचा शोध घेण्याच्या दृष्टीने व अद्ययावत नोंदी ठेवण्यासाठी 'मधुक्रांती'हे ऑनलाइन पोर्टल विकसित केले आहे. या पोर्टलवर मधमाशी पालकांनी नोंदणी करावी,असे आवाहन महाराष्ट्र राज्य फलोत्पादन आणि औषधी वनस्पती मंडळ, पुणे यांनी केले आहे. मधमाशा वनस्पतींच्या परागीकरणात महत्वाची भूमिका बजावतात त्यामुळे पिकांच्या उत्पादनात वाढ होते. मधाचे आयुर्वेदिकदृष्ट्या अनेक फायदे आहेत. त्यामुळे मधमाशीपालन काळाची गरज आहे. राज्यात राष्ट्रीय मधुमक्षिकापालन व मध अभियान ही केंद्र पुरस्कृत योजना राबविण्यात येत आहे. त्याअनुषंगाने महाराष्ट्र राज्य फलोत्पादन आणि औषधी वनस्पती मंडळ, पुणे यांना राष्ट्रीय मधुमक्षिका पालन व मध अभियान राबविणारी राज्यस्तरीय अंमलबजावणी यंत्रणा म्हणून केंद्र शासनाने मान्यता दिली आहे. या अभियानांतर्गत लघु अभियान I, लघु अभियान II व लघु अभियान III समाविष्ट असून यामध्ये विविध उपक्रम राबविले जाणार आहेत. कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्रालयाद्वारे राष्ट्रीय मधुमक्षिका मंडळ, नवी दिल्ली अंतर्गत मध आणि मधमाशी संबंधित अन्य उत्पादनांच्या योग्य स्त्रोताचा शोध घेण्याच्या दृष्टीने व अदययावत नोंदी ठेवण्यासाठी मधुक्रांती पोर्टल हे ऑनलाइन पोर्टल विकसित केलेले आहे. या पोर्टलवर मधुमक्षिका पालकांनी नोंदणी करावयाची आहे. मधुक्रांती पोर्टल वरील नोंदणीमुळे मधुमक्षिका पालकांना खालीलप्रमाणे लाभ होतील. · मधुमक्षिकापालकाला नोंदणीकृत/मान्यताप्राप्त मधुमक्षिकापालक म्हणून ओळख मिळेल. · नोंदणीधारकांना १ लाखापर्यंत मोफत विमा उपलब्ध होईल. · विना अडथळा मधुमक्षिका पेट्यांचे स्थलांतर नोंदणीसाठी आवश्यक कागदपत्रे - १) आधार कार्ड (नाव, जन्मतारीख, पत्तासहित) २) अद्ययावत भ्रमणध्वनी क्रमांक (आधार क्रमांकाशी जोडलेला) ३) मधुमक्षिका पालनासंबंधित तपशील ४) मधुमक्षिकापालन प्रशिक्षण प्रमाणपत्राची सॉफ्ट प्रत (आकार-२०० kb पर्यंत) ५) मधुमक्षिकापालकाचा मधुमक्षिका पेट्यांसमवेत फोटो (आकार-१०० kbपर्यंत) नोंदणी शुल्क- फक्त ऑनलाईन पद्धतीने अदा करता येईल. मधमाशांच्या वसाहतींच्या संख्येनुसार नोंदणी शुल्क आकारले जाते. ते याप्रमाणे १० ते १०० फ्रेम-२५० रुपये, १०१ ते २५० फ्रेम-५०० रुपये., २५१ ते ५०० फ्रेम – एक हजार रुपये, ५०१ ते १००० फ्रेम – दोन हजार रुपये, १००१ ते २००० फ्रेम – दहा हजार रुपये, २००१ ते ५००० फ्रेम – २५ हजार रुपये, ५००१ ते १०००० फ्रेम – एक लाख रुपये, १०००० पेक्षा अधिक फ्रेम –दोन लाख रुपये, याप्रमाणे. तरी मधमाशी पालकांना आवाहन करण्यात येते की, जास्तीत जास्त जणांनी मधुक्रांती पोर्टलवर नोंदणी करावी,असे आवाहन करण्यात आले आहे. नोंदणीकरिता वेबसाईट - madhukranti.in/nbb अधिक माहितीसाठी संपर्क - राष्ट्रीय मधमाशी मंडळ, नवी दिल्ली - ०११-२३३२५२६५, २३७१९०२५ मधुक्रांती पोर्टल – तांत्रिक सहाय्य- १८००१०२५०२६ महाराष्ट्र राज्य फलोत्पादन व औषधी वनस्पती मंडळ, पुणे - (०२०) २९७०३२२८

Dec 28, 2024 - 03:37
 0

1.

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow

Er.M.A. Shakeel Senior Journalist,Social and Political activist Sportsman,Singer.District VicePresident Human Right Council of India.