कळंकी येथील जलजिवन मिशन पाणीपुरवठा काम रखडले

कळंकी येथील जलजिवन मिशन पाणीपुरवठा काम रखडले मुजीब खान कन्नड प्रतिनिधी कन्नड: कळंकी ता. कन्नड येथील जलजिवन मिशन योजने अंतर्गत पाणी पुरवठा योजनेचे काम रखडल्याने ग्आवात पाणी टंचाई निर्माण झाली आहे. याबाबत कळंकी येथील माजी उपसरपंच हरिश थोरात यांनी कार्यकारी अभियंता पाणीपुरवठा विभाग जि.प. संभाजीनगर, गटविकास अधिकारी, तहसीलदार कन्नड यांना दि. 29 जानेवारी रोजी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, कळंकी येथे जलजिवन मिशन योजने अंतर्गत 2022 पासून सुरु असलेले पाणी पुरवठा काम अतीशय संथ गतीने सुरु आहे. त्यामुळे गावात तीव्र पाणीटंचाई निर्माण झाली आहे.‌हंडाभर पाण्यासाठी महिला ग्रामस्थांना वणवण भटकावे लागत आहे. नदी विहिरीच्या दुषीत पाण्यामुळे साथीचे आजार बळावण्याची शक्यता निर्माण झाली आहे. याबाबत संबंधीतांना वारंवार विनंती करुण ही संबंधित यंत्रणा दुर्लक्ष करीत आहे. रखडलेले काम तात्काळ पुर्ण करण्यात यावे. यामुळे ग्रामस्थांचा उद्वेग होऊन कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाल्यास संबंधित यास जबाबदार राहिल अशी सुचना निवेदनाद्वारे करण्यात आली आहे. याच पाणीपुरवठा योजनेच्या पाईपलाईन खोदकामास वनविभागाची परवानगी मिळत नसल्याच्या निषेधार्थ कळंकी ग्रामस्थांनी लोकसभा निवडणुकी वर बहिष्कार टाकण्याचा इशारा दिला होता. मात्र उपविभागीय अधिकारी, तहसीलदार कन्नड यांनी वनविभागाला परवानगी देण्याबाबत सुचना देऊण, परवानगी मिळाली होती. एवढे होउन ही संबंधित ठेकेदार पाईपलाईन कामास टाळाटाळ करीत असल्याने ग्रामस्थ त्रस्त झाले आहेत. उन्हाळा जवळ येऊन ही जलवाहिनीचे काम पूर्ण होत नसल्याने, आगामी काळात गावात तीव्र पाणीटंचाई निर्माण होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

Jan 30, 2025 - 21:29
 0
कळंकी येथील जलजिवन मिशन पाणीपुरवठा काम रखडले
1 / 1

1. कळंकी येथील जलजिवन मिशन पाणीपुरवठा काम रखडले

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow