अमिरी गरिबीतला फरक पैसा नव्हे शिक्षण आहे, प्रशासक जी श्रीकांत
अमिरी गरिबीतला फरक पैसा नव्हे शिक्षण आहे, प्रशासक जी श्रीकांत औरंगाबाद दि 24 फेब्रुवारी (प्रतिनिधि) एक माणूस पैसामुळे अमीर किंवा गरीब होत नाही, ज्याच्याकडे शिक्षण नाही तो माझ्या मते गरीब आहे, असे प्रतिपादन छत्रपती संभाजीनगर महानगरपालिकेचे आयुक्त तथा प्रशासक जी श्रीकांत यांनी आज भारतरत्न मौलाना अबुल कलाम आजाद संशोधन केंद्र येथे आयोजित एका राष्ट्रीय परिषदेत केले. मौलाना आजाद यांची पुण्यतिथी निमित्त भारतरत्न मौलाना अबुल कलाम आजाद संशोधन केंद्र, डिपार्टमेंट ऑफ इंग्लिश डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ, लोकसेवा एज्युकेशन सोसायटी यांचे आर्ट्स अँड सायन्स कॉलेज आणि डॉक्टर रफीक जकरिया सेंटर फॉर हायर लर्निंग अँड एडवांस्ड स्टडीज यांच्या संयुक्त विद्यमानाने आज दिनांक 22 फेब्रुवारी रोजी एका राष्ट्रीय परिषदेचे आयोजन करण्यात आले होते या परिषदेचे अध्यक्ष या नात्याने ते बोलत होते. सदरील परिषदेत मुख्य अतिथी म्हणून मौलाना अब्दुल कलाम आजाद यांची पुतणी हुसनारा सलीम यांची उपस्थिती होती. माजी संचालक बीसीयूडी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा युनिव्हर्सिटी डॉक्टर ए जी खान, डॉक्टर मजहर फारुकी, प्रिन्सिपल आजाद कॉलेज यांची विशेष उपस्थिती होती. सदरील परिसंवादाचे मुख्य वक्ते म्हणून डॉक्टर मेहरून निसा पठाण, प्राध्यापक इंग्लिश डिपार्टमेंट बामू हे होत्या. सदरील परिषदेचे आयोजनात जनसंपर्क अधिकारी तौसीफ अहमद, डॉक्टर मुस्तजीब खान, डॉक्टर लियाखत शेख, डॉक्टर कबीर अहमद, डॉक्टर जरताज हाश्मी यांनी परिश्रम घेतले आणि या परिषदेचे कॉन्व्हेनर म्हणून डॉ शेख परवेज अस्लम,डॉक्टर फरहत दुरानी, वसीयूर रहमान सिद्दिकी आणि डॉक्टर फैयाज फारुकी यांनी परिश्रम घेतले. जी श्रीकांत पुढे म्हणाले की अमिरी आणि गरिबीचा फरक लोक पैसांमध्ये करतात पण माझ्या मते गरीब माणूस तो आहे ज्यांनी जो शिक्षणापासून वंचित राहिलेला आहे. महिला सक्षमीकरण आणि महिला शिक्षणाबाबत बोलताना आयुक्त म्हणाले की मुला-मुली कोणीही असो आणि त्यांचे शिक्षणाचे माध्यम कोणतेही असो पण त्यांना शिक्षण देणे गरजेचे आहे. आजकाल मी बघतो की मुलाला इंग्रजी माध्यमामध्ये टाकल्या जाते आणि मुलीला मराठी किंवा उर्दू माध्यम शाळेत शिकायला पाठवतात किंवा मुलीला शिक्षणात देतच नाही. ते म्हणाले की हॉलमध्ये उपस्थित प्रत्येक महिला शिक्षिकांनी प्रतिज्ञा घ्यावी आणि त्यांनी प्रत्येकी शाळा सोडलेली एक मुलीचे शिक्षणची जबाबदारी घ्यावी. या प्रकारच्या लैंगिक भेदभाव संपला पाहिजे ते म्हणाले. मौलाना आजाद यांनी तयार केलेले शिक्षण धोरणामुळे आज अमीर, गरीब, मागासवर्ग, बहु संख्यांक आणि अल्पसंख्यांक प्रत्येक समाजातले मुला मुली शिक्षण घेत आहे. मौलाना आजाद एक महान नेता होते.1947-48 मध्ये जसा वातावरण होता त्या वातावरणात वाहून न जाता त्यांनी भारत आणि शिक्षाला पसंती दिली. आजच्या दिवशी सन 1958 साली ते आमच्यातून गेले होते आणि आपण या दिवशी एक महान नेता हरवला होता, ते म्हणाले. अल्पसंख्यांक समाजाबाबत महिला शिक्षिकांचे त्यांनी कौतुक केले. आपले पाल्यांना आपल्या मातृभाषेतच शिक्षण द्यावा, ज्याची मातृभाषा वर पकड असते तो कोणतीही भाषा सहजासहजी शिकू शकतो. याचा उदाहरण स्वतः मी आहे, माझी मातृभाषा कन्नडा असून मी यूपीएससी पास करून आता महाराष्ट्रात सनदी अधिकारी आहे. मराठी, इंग्रजी आणि हिंदी या सर्व भाषा मी सहजपणे बोलू आणि लिहू शकतो.याचे कारण माझी मातृभाषा आहे, ते पुढे म्हणाले. मातृभाषा बाबत ते पुढे म्हणाले की संपूर्ण जगात सॉफ्टवेअर लँग्वेज लिहिणारे भारतीय नागरिक आहे, याचे कारण असे आहे की भारतात शाळापासूनच किमान सहा भाषा शिकवल्या जातात. यामुळे सॉफ्टवेअर लँग्वेज भारताचे विद्यार्थी सहजपणे समजू शकतात, ते म्हणाले.

1.
What's Your Reaction?






