शिवना टाकळी मध्यम प्रकल्प कालवा सल्लागार समिती बैठक:

शिवना टाकळी मध्यम प्रकल्प कालवा सल्लागार समिती बैठक: मुजीब खान कन्नड( प्रतिनिधी) : गोदावरी पाटबंधारे महामंडळ येथे शिवना टाकळी मध्यम प्रकल्पाच्या कालवा सल्लागार समितीची बैठक कन्नड सोयगाव विधानसभा मतदार संघाच्या शिवसेना आमदार .संजनाताई जाधव व आमदार रमेश बोरनारे यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडली. या बैठकीत प्रकल्पाशी संबंधित महत्त्वाच्या मुद्द्यांवर चर्चा करून पुढील निर्णय घेण्यात आले. प्रकल्पातील उर्वरित गावांचे पुनर्वसन लवकरात लवकर पूर्ण करण्याच्या सूचना देण्यात आल्या, तसेच उजव्या कालव्याच्या चारीचे बाकी असलेले काम तातडीने पूर्ण करण्यावर भर देण्यात आला. शेतकऱ्यांच्या शेतापर्यंत पाणी पोहोचवण्यासाठी आवश्यक उपाययोजना करण्याचा निर्णय घेतला गेला. प्रकल्पासाठी दोन्ही कालव्यांसाठी १४ दिवसांच्या कालावधीत आवर्तन सोडण्यात येणार आहे. पहिल्या टप्प्यातील आवर्तन १२ जानेवारी २०२५ रोजी सुरू होईल, तर दुसऱ्या टप्प्यातील आवर्तन १६ ते २० फेब्रुवारी २०२५ दरम्यान होईल. ही बैठक प्रकल्पाच्या गतीसाठी आणि शेतकऱ्यांच्या हितासाठी अत्यंत महत्त्वाची ठरली.

Jan 13, 2025 - 01:53
 0
शिवना टाकळी मध्यम प्रकल्प कालवा सल्लागार समिती बैठक:
1 / 1

1. शिवना टाकळी मध्यम प्रकल्प कालवा सल्लागार समिती बैठक:

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow