माजी आमदार हर्षवर्धन जाधव यांना नागपूरला अटक
माजी आमदार हर्षवर्धन जाधव यांना नागपूरला अटक मुजीब खान कन्नड (प्रतिनिधी) कन्नड चे माजी आमदार हर्षवर्धन जाधव यांना पोलिसांनी १७ फेब्रुवारी दुपारी चार वाजता च्या सुमारास नागपुरात अटक केली शासकीय कामात अडथळा निर्माण केल्याच्या गुन्ह्यात जाधव हे न्यायालयात हजर झाले होते न्यायालयाने जाधव यांना अटक करून कारागृहात रवानगी करण्याचे आदेश दिले होते त्यानंतर पोलिसांनी जाधव यांना ताब्यात घेतले छातीत दुखत असल्याची तक्रार केल्यामुळे जाधव यांना मी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे माजी आमदार हर्षवर्धन जाधव यांनी २०१४ मध्ये विमानतळावर उद्धव ठाकरे आल्यानंतर त्यांच्या मंत्रालयीन सहायकाला शिवीगाळ करून मारहाण केली होती त्यावेळी त्या मंत्रालयीन सहायकाने सोनेगाव पोलीस ठाण्यात लेखी तक्रार दिली होती त्या तक्रारीवरून सोनेगाव पोलीस आणि जाधव यांच्यावर शिवीगाळ करणे आणि शासकीय कामात अडथळा निर्माण केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला होता २०१४ मध्ये गुन्हा दाखल करून पोलिसांनी न्यायालयात आरोप पत्र दाखल केले होते
What's Your Reaction?






