आमदार सौ संजना जाधव यांच्या हस्ते ब्लिचिंग मिक्सर चे उद्घाटन
मुजीब खान कन्नड ( प्रतिनिधी) : कन्नड नगरपालिका हद्दीतील कन्नड शहराला पिण्या चे पाण्याचा पुरवठा करणारे पाणी फिल्टर या ठिकाणी आज आमदार संजना जाधव यांनी ब्लिचिंग पावडर मिक्सर यंत्रांना चे उद्घाटन आज दिनांक १३ रोजी यांच्या शुभ हस्ते संपन्न झाले. कन्नड नगर परिषदेने गेला तेरा वर्षा पासून बंद असल्याने हे ब्लिचिंग मिक्सर व मोटर बंद होती. याची माहिती समोर आल्यानंतर दहा दिवस अगोदर आमदार जाधव व उपविभागीय अधिकारी संतोष गोराड यांनी भेट दिली होती. आ संजना जाधव यांना शहरातील सर्व सामान्य महिला व नागरिक यांनी भेटून तक्रार केले होती नगरपालिकेच्या वतीने दूषित पाण्याचा पुरवठा होत आहे व पाणी पिण्यास योग्य नाही पाण्याचा घाणेरडा वास येतो याचा विचार करून लगेच आ संजना जाधव पाणी फिल्टर भेट दिली व प्रत्यक्ष पाहणी केली असताना त्या ठिकाणी असे आढळून आले की तेथील यंत्रणा ही गेल्या तेरा वर्षां पासून बंद आहे अशी माहिती तेथील एका कर्मचाऱ्यांनी नाव न सांगण्याचे अटीवर दिली.कन्नड नगर पालिके वतीने शहरातील जनतेला तोच पाण्याचा पुरवठा होत आहे. दूषित पाणी पिल्या मुळे लोकांच्या आरोग्याला धोका निर्माण होऊ शकतो हाच विचार करून आ जाधव यांनी ताबडतोब आदेशित करून त्या ठिकाणी ब्लिचिंग मिक्सर पावडर यंत्रणा सुरू करण्यात आली. याप्रसंगी कन्नड नगरपालिकेचे प्रशासक तथा तहसीलदार विद्याचरण कडवकर म्हणाले की आता कन्नड शहरवासीयांना स्वच्छ पाणी येणार आहे. याप्रसंगी कन्नड पंचायत समितीचे बी डी ओ चंद्रहार ढोकणे, नगरपालिका पाणीपुरवठा निरीक्षक देविदास पाटील, बाजीराव शिरसे, माजी उपनगराध्यक्ष डॉ सदाशिव पाटील, रत्नाकर पंडित, कैलास जाधव, संतोष पवार, आदित्य गर्जे पाटील, जयेश बोरसे ज्ञानेश्वर निकम पवन सोनवणे, राम पवार सिद्धार्थ निकाळजे, लक्ष्मीकांत सुरे, प्रकाश काचोळे,रितेश जाधव, विश्वजीत बागुल, प्रदीप बोडखे, श्रीराम घुगे, प्रशांत बारगळ, प्रशांत शिंदे, अनिल थोरात, दीपक दाभाडे, अल्केश नवले, प्रल्हाद तायडे, संदीप घोंगटे, इत्यादी शिवसैनिक व कार्यकर्ते उपस्थित होते.

1. आमदार सौ संजना जाधव यांच्या हस्ते ब्लिचिंग मिक्सर चे उद्घाटन
What's Your Reaction?






