उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांचे आगमन व स्वागत छत्रपती संभाजीनगर

उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांचे आगमन व स्वागत छत्रपती संभाजीनगर, दि.२२(जिमाका)- उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांचे आज दुपारी दीड वा.सुमारास छत्रपती संभाजीनगर विमानतळावर भारतीय वायुसेनेच्या विमानाने आगमन झाले. त्यांच्या समवेत त्यांच्या सुविद्य पत्नी डॉ. श्रीमती सुदेश धनखड या ही होत्या. विमानतळावर त्यांचे स्वागत करण्यात आले. राज्यपाल सी.पी. राधाकृष्णन, समाजिक न्याय मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री संजय शिरसाट, इतर मागासवर्ग व बहुजन कल्याण मंत्री अतुल सावे, राज्यसभा सदस्य खा. डॉ. भागवत कराड, खासदार संदिपान भुमरे, आ. अनुराधाताई चव्हाण तसेच कुलगुरु डॉ. विजय फुलारी, पालक सचिव हर्षदीप कांबळे, विभागीय आयुक्त दिलीप गावडे, मनपा आयुक्त जी. श्रीकांत,जिल्हाधिकारी दिलीप स्वामी, अति. पोलीस महासंचालक कृष्ण प्रकाश, छत्रपती संभाजीनगर परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक विरेंद्र मिश्र, पोलीस आयुक्त प्रवीण पवार आदी उपस्थित होते. स्वागतानंतर उपराष्ट्रपती धनखड सपत्निक व राज्यपाल सी.पी. राधाकृष्णन यांच्या समवेत हेलिकॉप्टरने वेरुळकडे रवाना झाले.

Feb 22, 2025 - 20:06
Feb 23, 2025 - 18:14
 0
Arrival and welcome of Vice President Jagdeep Dhankhad chhatrapati Sambhajinagar
1 / 1

Arrival and welcome of Vice President Jagdeep Dhankhad chhatrapati Sambhajinagar

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow