शेतकरी बांधव विनाअडथळा थेट शेतीत पोहोचणार; वर्षानुवर्षे प्रलंबित प्रकरणाचा तत्काळ करा निपटारा - आमदार विलास भुमरे
शेतकरी बांधव विनाअडथळा थेट शेतीत पोहोचणार; वर्षानुवर्षे प्रलंबित प्रकरणाचा तत्काळ करा निपटारा - आमदार विलास भुमरे पैठण : पंचायत समिती कार्यालय पैठण येथे ग्रामीण भागातील रस्ते, गाडीवाट, पायमार्ग तसेच शेतात जाणारे मार्ग या सर्व रस्त्यांचे सीमांकन करण्याबाबत तालुकास्तरीय आढावा बैठक आमदार विलास भुमरे यांच्या अध्यक्षतेत पार पडली. ग्रामीण भागातील शेतकरी बांधवांना शेतात ये-जा करण्यासाठी अनेक ठिकाणी अडचणींचा सामना करावा लागतो, या समस्येचे कायमस्वरूपी निराकरण करण्यासाठी या बैठकीत सविस्तर चर्चा करण्यात आली. यावेळी पंचायत समिती, तहसील, भूमी अभिलेख, कृषी तसेच पोलीस प्रशासन या सर्व संबंधित कार्यालयांना विशेष सूचना देण्यात आल्या असून, या सर्व विभागांच्या समन्वयातून शेतकरी बांधवांना शेतात जाण्यासाठी विनाअडथळा रस्ते उपलब्ध करून देण्याचा निर्धार या बैठकीत व्यक्त करण्यात आला. यामुळे ग्रामीण भागातील वाहतूक सुलभ होणार असून शेतकऱ्यांना शेतीकाम व शेतमालाची बाजारपेठेत ने-आण अधिक सोयीस्करपणे करता येणार असल्याची माहिती आमदार विलास भुमरे यांनी दिली.
1.



What's Your Reaction?

