प्रलंबित प्रश्न न सोडवल्याने शिवसेनेचे उपोषण
मुजीब खान कन्नड (प्रतिनिधी). : कन्नड शहरातील प्रभाग क्रमांक पाच मधील समस्यासाठी उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेचे उपशहर प्रमुख चंद्रकांत लाडे यांनी दिलेल्या निवेदनातील जणतेच्या समस्या चे निवारण न झाल्याने शिवसैनिकासह उपोषणास सुरुवात केली अनेक दिवसा पासून कन्नड शहरातील भीमनगर ,भोईवाडा ,येथील बेघर नागरिकांसाठी हक्काची जागा हक्काचे घरकुलाची अमलबजावणी तात्काळ करून बेघर नागरिकांना न्याय देण्यात यावा भीम नगर मधील नाल्यांचे काम तात्काळ करण्यात यावे कन्नड शहरात नागरिकांना पिण्याच्या पाण्यासाठी नवीन जलवाहिनी पाईपलाईन करून ब्लिचिंग तुरटीचा वापर करून शुद्ध पाणीपुरवठा करण्यात यावा कन्नड शहरातील प्रत्येक प्रभागांमध्ये जनतेसाठी कचरा साठवण्यासाठी कुंडीची, डबा, किंवा बकेटची व्यवस्था करण्यात यावी प्रभाग क्रमांक पाच मधील ओपन स्पेस वरील सुशोभीकरण साठी वापरलेल्या निधीत कामाची पाहणी करून पडलेले गट्टू वरील कच व मधील काँग्रेस गवत तातडीणे काढून स्वच्छता राबवावी तसेच भीम नगर मधील बुद्ध विहार येथील सभा मंडप मंजुर असून वर्कऑर्डर झालेली असल्याने संबंधित गुत्तेदारास तातडीने आदेश करून कामाला सुरुवात करण्यासाठी आदेश दयावा कन्नड शहरात शुद्ध पाणी पुरवठा करण्यासाठी ब्लिचिंग वर तुरटीचा वापर करावा शहर प्रमुख सदाशिव पाटील यांनी सांगितले की असे अनेक प्रश्न शहरात प्रलंबित आहेत ते तातडीने मार्गी लावावेत अन्यथा ढोल ताशा आंदोलन करण्यात येईल असा इशारा त्यावेळी देण्यात आला मागण्यासाठी उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेचे उपशहर प्रमुख चंद्रकांत लाडे शिवसेना महिला विभाग संघटक अनिता लाडे, यांच्यासह शहर प्रमुख डॉ सदाशिव पाटील उपशहर प्रमुख सलमान शेख लक्ष्मीकांत सुरे विभाग प्रमुख प्रकाश काचोळे व शिवसैनिकांची उपस्थिती होती उशिरा संध्याकाळी लेखी पत्र दिल्याने उपोषण स्थगित करण्यात आले यावेळी कन्नड नगरपालिकेचे प्रतिनिधी गणेश अंदोरे, अभियंता राहुल करडे ,नारायण कनगरे ,प्रशांत देशपांडे, सिद्धार्थ बनकर,आदीची उपस्थित होती

1. प्रलंबित प्रश्न न सोडवल्याने शिवसेनेचे उपोषण
What's Your Reaction?






