टाकळी राजेराय शाळेत प्रभारी मुख्याध्यापकांचा मनमानी कारभार?

???? टाकळी राजेराय शाळेत प्रभारी मुख्याध्यापकांचा मनमानी कारभार? खुलताबाद तालुक्यातील जि.प. माध्यमिक शाळा, टाकळी राजेराय येथे प्रभारी मुख्याध्यापकांविरोधात शालेय व्यवस्थापन समिती सदस्य संजय जाधव यांनी लेखी तक्रार दाखल केली आहे. जिल्हाधिकारी व शिक्षणाधिकारी यांच्या आदेशानुसार दि.२८ ऑगस्ट रोजी विशेष पालक सभा घेणे बंधनकारक होते, मात्र प्रभारी मुख्याध्यापकांनी आदेशांचे पालन न करता बिना तारखेची नोटीस व्हॉट्सॲपवर पाठवून काही निवडक पालकांना बोलावून सभा उरकून घेतली असल्याचा आरोप आहे. सभेत दशसूत्री गुणवत्ता वाढ उपक्रम राबवला गेला नाही तसेच शाळेत नियमित तासिका देखील होत नसल्याचे आढळून आले. मागील वर्षीच्या एनएमएमएस शिष्यवृत्ती परीक्षेत शाळेचा निकाल शून्य टक्के लागल्याने पालक व ग्रामस्थांमध्ये नाराजीचे वातावरण आहे. प्रभारी मुख्याध्यापक गेली तब्बल ३२ वर्षे त्याच शाळेत कार्यरत असून त्यांच्या कारभारात शिथिलता आल्याचा आरोप करण्यात आला आहे. त्यामुळे प्रभारी मुख्याध्यापकांवर तात्काळ कारवाई करून बदली करण्यात यावी व शाळेकडे विशेष लक्ष द्यावे, अशी मागणी शा.व्य.स. सदस्य संजय जाधव यांनी केली आहे.

Sep 9, 2025 - 18:28
Sep 9, 2025 - 18:29
 0
1 / 1

1.

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow