जिल्हाधिकारी कार्यालयातील नारीशक्तीची मोटारसायकल रॅली
जिल्हाधिकारी कार्यालयातील नारीशक्तीची मोटारसायकल रॅली छत्रपती संभाजीनगर, दि.८(प्रतिनिधि):- जागतिक महिला दिनानिमित्त आज जिल्हाधिकारी कार्यालयातील नारीशक्तीची मोटारसायकल रॅली आयोजीत करण्यात आली. जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांच्या हस्ते झेंडी दाखवून ही रॅली रवाना करण्यात आली. जिल्हाधिकारी कार्यालयातील महिला अधिकारी कर्मचारी या रॅलीत सहभागी झाल्या. उपजिल्हाधिकारी डॉ. सुचिता शिंदे, संगिता राठोड तसेच जिल्हाधिकारी कार्यालयातील महिला कर्मचारी अधिकारी यावेळी उपस्थित होत्या. जिल्हाधिकारी कार्यालयातून सकाळी साडेनऊ वा. ही रॅली निघून क्रांती चौकात या रॅलीचा समारोप झाला

1.
What's Your Reaction?






