नेताजी सुभाषचंद्र बोस व स्व.बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतनिमित्त अभिवादन
नेताजी सुभाषचंद्र बोस व स्व.बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतनिमित्त अभिवादन छत्रपती संभाजी नगर दि.२३ जानेवारी (प्रतिनिधि ) नेताजी सुभाषचंद्र बोस व स्व.बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतनिमित्त छत्रपती संभाजी नगर महानगरपालिकेच्या वतीने आज अभिवादन करण्यात आले. महर्षी दयानंद सरस्वती चौक येथील स्व.बाळासाहेब ठाकरे यांच्या म्युरलला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.यावेळी उप आयुक्त लखीचंद चव्हाण,माहिती व जनसंपर्क अधिकारी तौसीफ अहमद,अतुल बनकर यांची उपस्थिती होती. महानगरपालिका मुख्यालय येथे नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या प्रतिमेला मा.आयुक्त तथा प्रशासक जी श्रीकांत यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.यावेळी अतिरिक्त आयुक्त रणजीत पाटील,उप आयुक्त लखीचंद चव्हाण,अंकुश पांढरे,मुख्य लेखा परीक्षक शिवाजी नाईकवाडे, सांस्कृतिक अधिकारी शंभू विश्वासू,माहिती व जनसंपर्क अधिकारी तौसीफ अहमद, जनसंपर्क विभागाचे रविंद्र खरात, संतोष कोठाळे आदींची उपस्थिती होती.

1.
What's Your Reaction?






