केंद्रीय सामाजिक न्याय मंत्री यांचे हस्ते ERSU किटचे मनपास हस्तांतरण ड्रनेज सफाई कामगारांना पीपीइ किटचे वितरण

केंद्रीय सामाजिक न्याय मंत्री यांचे हस्ते ERSU किटचे मनपास हस्तांतरण ड्रनेज सफाई कामगारांना पीपीइ किटचे वितरण दि.०८ मे २०२५(प्रतिनिधि) मा.केंद्रीय सामाजिक व न्याय मंत्री विरेंद्र कुमार यांचे हस्ते छत्रपती संभाजी नगर महानगरपालिकेस ERSU कीटचे हस्तांतरण करण्यात आले. एमजीएम महाविद्यालय येथील रुख्मिणी सभागृह येथे आज मा.मंत्री महोदय यांच्या हस्ते ड्रेनेज सफाई कामगारांना पी पी इ किटचे वितरण सुद्धा करण्यात आले.सामाजिक न्याय व अधिकारिता विभाग,भारत सरकार व छत्रपती संभाजी नगर महानगरपालिकेच्या संयुक्त विद्यमाने हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. मान्यवरांच्या हस्ते दीप प्रज्वलन करून या कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली.या वेळी मां.आमदार अनुराधा चव्हाण,व्यवस्थापकीय संचालक NSKFDC नवी दिल्ली प्रभातकुमार सिंग,अतिरिक्त आयुक्त रणजीत पाटील,उप आयुक्त विजय पाटील,लखीचंद चव्हाण,आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉ पारस मंडलेचा,कार्यकारी अभियंता अनिल तनपुरे ,अमोल कुलकर्णी,फारुख खान आदींची उपस्थिती होती. यावेळी मा.मंत्री महोदय यांनी उपस्थित यांना मार्गदर्शन केले. तसेच छत्रपती संभाजी नगर महानगरपालिकेच्या वतीने ड्रेनेज सफाई कामगारांसाठी राबविण्यात येणाऱ्या योजना व उपलब्ध करून देण्यात आलेल्या सुविधांचे त्यांनी यावेळी विशेष कौतुक केले. मान्यवरांच्या हस्ते एकूण ०५ मजुरांना आयुष्मान कार्डचे वितरण करण्यात आले. तसेच एकूण १६ ड्रेनेज सफाई कामगारांना PPE कीटचे वितरण करण्यात आले.तसेच मा.मंत्री महोदय यांच्या हस्ते स्वच्छता उद्यमी योजना अंतर्गत कर्ज मंजूर पत्राचे वितरण करण्यात आले.यावेळी त्यांनी महानगरपालिकेच्या विविध लोकोपयोगी मशिनरीची पाहणी केली व महानगरपालिकेच्या तांत्रिक सुसज्जतेबद्दल समाधान व्यक्त केले.यावेळी त्यांचे समवेत मा.पालक मंत्री संजय शिरसाठ यांची विशेष उपस्थिती होती. नमस्ते योजना सफाई कर्मचाऱ्यांना प्रतिष्ठा प्रदान करण्याच्या आणि त्यांना सामाजिक आणि आर्थिक दृष्ट्या सक्षम करण्याच्या उद्देशाने भारत सरकारने नॅशनल ॲक्शन फॉर मेकॅनाईज्द सॅनिटेशन इकोसिस्टीम (NAMASTE) तयार केले आहे.२०२५ २०२६ पर्यंत पुढील तीन वर्षात देशातील सर्व ४८०० +ULB मध्ये NAMASTE ची अंमलबजावणी केली जाणार आहे. त्यासाठी ३४९.७० कोटी रुपये खर्च येणार आहे.हा सामाजिक न्याय आणि सक्षमीकरण विभाग आणि गृहनिर्माण आणि शहरी व्यवहार मंत्रालयाचा संयुक्त उपक्रम आहे. अशी माहिती मंत्री महोदय यांनी यावेळी दिली. या कार्यक्रमास सफाई मजूर,स्वच्छता कर्मचारी यांची मोठ्या प्रमाणावर उपस्थिती होती.

May 11, 2025 - 04:29
 0
1 / 1

1.

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow

Er.M.A. Shakeel Senior Journalist,Social and Political activist Sportsman,Singer.District VicePresident Human Right Council of India.