जिल्हाधिकारी कार्यालयात रक्तदान शिबीर
जिल्हाधिकारी कार्यालयात रक्तदान शिबीर छत्रपती संभाजीनगर, (प्रतिनिधि)- शहरातील रक्तपेढ्यांमध्ये रक्त साठ्यात तुटवडा असल्याने जिल्हा प्रशासनाने पुढाकार घेत जिल्हाधिकारी कार्यालयात रक्तदान शिबिराचे आयोजन केले. या शिबिरात जिल्हाधिकारी कार्यालयातील अधिकारी- कर्मचारी यांनी रक्तदान केले. आज सकाळी जिल्हाधिकारी कार्यालयात या शिबिराचे आयोजन करण्यात आले. जिल्हाधिकारी दिलीप स्वामी, निवासी उपजिल्हाधिकारी विनोद खिरोळकर, जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी मारुती म्हस्के, विधी अधिकारी श्रीमती वायाळ तसेच जिल्हाधिकारी कार्यालयातील अधिकारी कर्मचारी उपस्थित होते. डॉ. महेश लढ्ढा व त्यांच्या सहकाऱ्यांनी रक्तदान विषयक प्रक्रिया पार पाडली. दुपार पर्यंत २५ जणांनी रक्तदान केले होते. रक्तदान सायंकाळ पर्यंत सुरु राहणार आहे.

1.
What's Your Reaction?






