कन्नड तालुक्यातील शिवना -टाकळी जलसंपदा विभागाचा मनमानी कारभार
कन्नड तालुक्यातील शिवना -टाकळी जलसंपदा विभागाचा मनमानी कारभार मुजीब खान कन्नड टाकळी प्रकल्पाच्या डाव्या व उजव्या कालव्याचे पाणी सुटून आठ दिवस झालेले आहे. जानेवारी महिन्यात डाव्या व उजव्या कालव्यातून हे पहिले आवर्तन सोडण्यात आले आहे. देवगावचा डावा कालवा १२ किलोमीटर आहे तरीही देवगाव पर्यंत प्रकल्प झाला तेव्हापासून पाणी आतापर्यंत कधीही गेले नाही तर वैजापूर कडे जाणारा उजवा कालवा जवळपास ५४ किलोमीटर आहे. परंतु १० ते १५ किलोमीटर च्या पुढे पाणी कधीही गेले नाही जागोजागी पाण्याची प्रचंड गळती आहे. मुख्य कालव्याचे आरसीसी अस्तरीकरण झालेले नाही पैसे मात्र निघालेले आहेत प्रत्यक्ष शेती पिकाला पाणी कुठेही मिळत नाही. शेत पोटचारीचेही कामं झालेले नाही त्यामुळे दोन्ही कालव्याचे पाणी ओढ्या नाल्यात जात आहे. शिवना - टाकळी धरण जेमतेम पावणे दोन टीएमसी आहे त्यात आता बोरसर पासून लासुर स्टेशन पर्यंत शिवना नदीच्या दोन्ही बाजूंच्या शेतकऱ्यांचे ७/१२ व १००० रुपये वर्गणी नदीपात्रात पाणी सोडण्यासाठी घेतली जात आहे. जवळपास ३५ ते ४० छोटे मोठे केटीवेअर सिमेंट बंधारे आहेत हे सगळे भरायचे ठरल्यास शिवना टाकळी प्रकल्प रिकामा होईल. शिवना टाकळी प्रकल्पाच्या पाण्यावर व शेतकऱ्यांवर प्रकल्पग्रस्तांच्या प्रश्नावर तालुक्यातील कोणतेही पुढारी अथवा अधिकारी यांचे लक्ष नाही . शिवना टाकळी प्रकल्पातून हतनूर, गल्लेबोरगाव, वेरूळ,जैतापूर, टापरगाव, अंतापुर ,आलापुर, देभेगाव, देवळाना ,ताडपिंपळगाव, देवगाव, चापानेर, जळगाव घाट व जवळी आदी सह १६ ते १७ गावांचा पाणीपुरवठा आहे . संबंधित ग्रामपंचायती देखील या प्रश्नावर मौन बाळगून आहेत, प्रकल्पाचे पाणी कमी झाल्यानंतर हे लोक प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांच्या मोटार बंद करा, बागायती बंद करा असा पवित्रा घेत सातत्याने प्रकल्पग्रस्तांवर अन्याय होत असतो, शिवना टाकळी धरणाचे बॅकवॉटरच्या व लाभधारक शेतकऱ्यांनी जागृत होऊन नदीपात्रात पाणी सोडण्यास विचार करायला लावावा. नदीपात्रात पाणी सुटल्यास अवघ्या दहा ते पंधरा तासात धरण रिकामे होईल त्यामुळे प्रकल्पावर आधारित कन्नड तालुक्यातील शेतकरी व पाणी पुरवठा योजना धोक्यात येईल. पाणी पुरवठा योजना राबविण्यार्या ग्रामपंचायत यांनी गांभीर्याने विचार करावा व जलसंपदा विभागाचा मनमानी कारभार थांबवावा असे आवाहन प्रहार शेतकरी संघटना तालुका अध्यक्ष तथा प्रकल्पग्रस्त शेतकरी प्रकाश आहेर सह शेतकरयांनी केले आहे. प्रतिक्रिया प्रकाश आहेर - ( शेतकरी टाकळी लव्हाळी ) जलसंपदा विभाग मनमानी कारभार करत असुन कुठल्याही नियम न पाळता पाणी सोडले जात आहे. कालवा सल्लागार समिती ची बैठक येथे न घेता परस्पर घेऊन मनमानी कारभार सुरू आहे. या गंभीर प्रश्नाकडे तालुक्यातील कोणत्याही नेत्यांचे लक्ष नाही,
2. प्रजासत्ताक दिनासाठी शाळांची जया तयारी मुजीब खान कन्नड (प्रतिनिधी) अवघ्या तीन दिवसावर येऊन ठेपलेल्या प्रजासत्ताक दिनाची जय्यत तयारी शाळांमध्ये सुरू झाली आहे नन्ना मुन्ना राही हु देश का शिपाई हू बोलो मेरे संग जय हिंद जय हिंद जय घोषित लेझीम बँड एन सी सी संचालन करण्यात विद्यार्थी देखील मग्न झाले आहेत नेहमी प्रजासत्ताक दिन दिमाखास साजरा केला जातो यंदा मात्र त्यात आणखीन आकर्षक असणार आहे याविषयी आपले प्रतिनिधींनी शहरातील शाळांमध्ये या निमित्त काय तयारी आहे या संदर्भात संवाद साधला असला काही विशेष नि
प्रजासत्ताक दिनासाठी शाळांची जया तयारी
मुजीब खान कन्नड (प्रतिनिधी)
अवघ्या तीन दिवसावर येऊन ठेपलेल्या प्रजासत्ताक दिनाची जय्यत तयारी शाळांमध्ये सुरू झाली आहे नन्ना मुन्ना राही हु देश का शिपाई हू बोलो मेरे संग जय हिंद जय हिंद जय घोषित लेझीम बँड एन सी सी संचालन करण्यात विद्यार्थी देखील मग्न झाले आहेत नेहमी प्रजासत्ताक दिन दिमाखास साजरा केला जातो यंदा मात्र त्यात आणखीन आकर्षक असणार आहे याविषयी आपले प्रतिनिधींनी शहरातील शाळांमध्ये या निमित्त काय तयारी आहे या संदर्भात संवाद साधला असला काही विशेष नियोजन यंदा करण्यात आल्याचे दिसून आले दिल्लीच्या लाल किल्ल्यावर ज्याप्रमाणे परळ होते सांस्कृतिक कार्यक्रम होतात पारंपारिक वेशभूषा आणि संस्कृतीचे दर्शन घडवले जाते अगदी त्याचप्रमाणे आमच्या शाळेचा प्रजासत्ताक दिन असणार आहे अजित दादा पवार उर्दू हायस्कूल अँड ज्युनिअर कॉलेज मोहम्मदिया उर्दू प्रायमरी स्कूल सारा इंग्लिश स्कूल समर्थ नगर कन्या शाळा पण शाळेच्या मुख्याध्यापिका यांनी सांगितले ह्यानिमित्ताने निबंध क्रीडा देशभक्तीवर गीते चित्रकला आदी स्पर्धा ही काही शाळांमध्ये घेतल्या जाणार आहेत देशाभिमान प्रत्येक व्यक्तीत असतो तो काही क्षणापुरता मर्यादित राहू नये म्हणून हा दिवस साजरा केला जातो देशाला प्रजासत्ताक कशी मिळाली त्यासाठी थोर व्यक्तींनी दिलेल्या योगदानाची माहिती या निमित्ताने देण्यात येणार आहे विद्यार्थी वर्गाबरोबर शाळेचा परिसर स्वच्छ करणे पताका लावून सजावट पीटी ढोल याचे विशेष आकर्षण यानिमित्ताने पाहायला मिळणार आहे आणि खास गोष्ट म्हणजे यात विद्यार्थी कुठेच मागे नाहीत शिक्षकांच्या मार्गदर्शनावरून विद्यार्थ्यांची तयारी जयत सुरू असून सगळे सज्ज झाले आहेत
What's Your Reaction?






