कन्नड तालुक्यातील शिवना -टाकळी जलसंपदा विभागाचा मनमानी कारभार
कन्नड तालुक्यातील शिवना -टाकळी जलसंपदा विभागाचा मनमानी कारभार मुजीब खान कन्नड टाकळी प्रकल्पाच्या डाव्या व उजव्या कालव्याचे पाणी सुटून आठ दिवस झालेले आहे. जानेवारी महिन्यात डाव्या व उजव्या कालव्यातून हे पहिले आवर्तन सोडण्यात आले आहे. देवगावचा डावा कालवा १२ किलोमीटर आहे तरीही देवगाव पर्यंत प्रकल्प झाला तेव्हापासून पाणी आतापर्यंत कधीही गेले नाही तर वैजापूर कडे जाणारा उजवा कालवा जवळपास ५४ किलोमीटर आहे. परंतु १० ते १५ किलोमीटर च्या पुढे पाणी कधीही गेले नाही जागोजागी पाण्याची प्रचंड गळती आहे. मुख्य कालव्याचे आरसीसी अस्तरीकरण झालेले नाही पैसे मात्र निघालेले आहेत प्रत्यक्ष शेती पिकाला पाणी कुठेही मिळत नाही. शेत पोटचारीचेही कामं झालेले नाही त्यामुळे दोन्ही कालव्याचे पाणी ओढ्या नाल्यात जात आहे. शिवना - टाकळी धरण जेमतेम पावणे दोन टीएमसी आहे त्यात आता बोरसर पासून लासुर स्टेशन पर्यंत शिवना नदीच्या दोन्ही बाजूंच्या शेतकऱ्यांचे ७/१२ व १००० रुपये वर्गणी नदीपात्रात पाणी सोडण्यासाठी घेतली जात आहे. जवळपास ३५ ते ४० छोटे मोठे केटीवेअर सिमेंट बंधारे आहेत हे सगळे भरायचे ठरल्यास शिवना टाकळी प्रकल्प रिकामा होईल. शिवना टाकळी प्रकल्पाच्या पाण्यावर व शेतकऱ्यांवर प्रकल्पग्रस्तांच्या प्रश्नावर तालुक्यातील कोणतेही पुढारी अथवा अधिकारी यांचे लक्ष नाही . शिवना टाकळी प्रकल्पातून हतनूर, गल्लेबोरगाव, वेरूळ,जैतापूर, टापरगाव, अंतापुर ,आलापुर, देभेगाव, देवळाना ,ताडपिंपळगाव, देवगाव, चापानेर, जळगाव घाट व जवळी आदी सह १६ ते १७ गावांचा पाणीपुरवठा आहे . संबंधित ग्रामपंचायती देखील या प्रश्नावर मौन बाळगून आहेत, प्रकल्पाचे पाणी कमी झाल्यानंतर हे लोक प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांच्या मोटार बंद करा, बागायती बंद करा असा पवित्रा घेत सातत्याने प्रकल्पग्रस्तांवर अन्याय होत असतो, शिवना टाकळी धरणाचे बॅकवॉटरच्या व लाभधारक शेतकऱ्यांनी जागृत होऊन नदीपात्रात पाणी सोडण्यास विचार करायला लावावा. नदीपात्रात पाणी सुटल्यास अवघ्या दहा ते पंधरा तासात धरण रिकामे होईल त्यामुळे प्रकल्पावर आधारित कन्नड तालुक्यातील शेतकरी व पाणी पुरवठा योजना धोक्यात येईल. पाणी पुरवठा योजना राबविण्यार्या ग्रामपंचायत यांनी गांभीर्याने विचार करावा व जलसंपदा विभागाचा मनमानी कारभार थांबवावा असे आवाहन प्रहार शेतकरी संघटना तालुका अध्यक्ष तथा प्रकल्पग्रस्त शेतकरी प्रकाश आहेर सह शेतकरयांनी केले आहे. प्रतिक्रिया प्रकाश आहेर - ( शेतकरी टाकळी लव्हाळी ) जलसंपदा विभाग मनमानी कारभार करत असुन कुठल्याही नियम न पाळता पाणी सोडले जात आहे. कालवा सल्लागार समिती ची बैठक येथे न घेता परस्पर घेऊन मनमानी कारभार सुरू आहे. या गंभीर प्रश्नाकडे तालुक्यातील कोणत्याही नेत्यांचे लक्ष नाही,

3. अल्पसंख्याक शहर जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीने महावितरणाचे चीफ इंजिनिअर( मुख्य अभियंता ) पवन कुमार कचोट यांना 8 आठ दिवसात स्मार्ट प्रीपेड मीटर बंद नाही केले तर महावितरण कार्यालयाला लोकशाही मार्गाने कुलूप लावण्याची धमकी दिली.
अल्पसंख्याक शहर जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीने महावितरणाचे चीफ इंजिनिअर( मुख्य अभियंता ) पवन कुमार कचोट यांना 8 आठ दिवसात स्मार्ट प्रीपेड मीटर बंद नाही केले तर महावितरण कार्यालयाला लोकशाही मार्गाने कुलूप लावण्याची धमकी दिली.
गुरुवार रोजी सकाळी बारा 12 वाजता जुबली पार्क येथे महावितरण कार्यालयाचे मुख्य अभियंता पवन कुमार कचोट यांना अल्पसंख्यांक शहर जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष मोईन इनामदार यांच्या नेतृत्वाखाली स्मार्ट प्रीपेड मीटर बसवण्याची मोहीम तात्काळ थांबवण्यात यावी असे निवेदन देण्यात आले नसता लोकशाही मार्गाने सह व्यवस्थापक संचालक यांच्या कार्यालयाला कुलूप लावण्यात येईल असा सज्जड इशारा काँग्रेसच्या नेत्यांनी दिला यामध्ये मुख्य अभियंता (चीप इंजिनियर )पवन कुमार कचोट यांनी सविस्तर माहिती दिली नाही व प्रश्नाचे उत्तर दिले नाही त्यांना अल्पसंख्याक काँग्रेस कमिटीच्या वतीने आठ दिवसाच्या आत स्मार्ट प्रीपेड मीटर ची मोहीम थांबवण्यात यावी असा सज्ज इशाराही देण्यात आला नसता लोकशाही मार्गाने तुमच्या काँग्रेसच्या वतीने कार्यालयाला कुलूप लावून किंवा लोकशाही मार्गाने तीव्र आंदोलन करू अशी त्यांना धमकी दिली तसेच शहरांमध्ये ग्राहक वीज बिल भरून सुद्धा त्यांना वेळेवर 24 तास वीज मिळत नाही याबद्दल नागरिकांची व्यवसायाचे नुकसान होते हॉस्पिटलमध्ये रुग्णांचे हाल होतात नागरिकांना नाहक त्रास होतो वेळोवेळी वीज बत्ती गुल झाल्याने त्रास सहन करावा लागतो नागरिकांना 24 तास वीज देण्याची ही निवेदनामध्ये विशेष नमूद केलेले आहेत यामध्ये नागरिकांकडे जर महावितरण ने स्मार्ट प्रीपेड मीटर बसवले त्याला रिचार्ज करावे लागतात जोपर्यंत रिचार्ज असतो तोपर्यंत नागरिकांना वीज मिळते जर कोणी नोकरदार असेल किंवा मजदूर शेतकरी असेल त्याच्याकडे जर वेळेवर पैसे उपलब्ध नसेल तर त्याच्या घरातील वीज बंद होईल त्यात त्याला आंध्रात राहावं लागेल आत्ताचे जे मीटर आहेत यामध्ये नागरिकांनी एक दोन महिन्यानंतर जरी वीज बिल भरले नाही तरी त्याच्या घरामध्ये अंधार होत नाही हे आठवण करून देण्यात आली यावेळी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे मार्गदर्शक प्रकाश मुगदिया महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस डॉ जफर अहमद खान महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी अल्पसंख्याक विभागाचे प्रदेश उपाध्यक्ष इब्राहिम पठाण मनपाचे माजी सभापती ॲड एकबालसिंग गिल शहर जिल्हा काँग्रेसचे जेष्ठ नेते आकिफ रजवी अल्पसंख्याक शहर जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष मोईन इनामदार शहर जिल्हा काँग्रेस कमिटीचे कार्यअध्यक्ष डॉ अरुण शिरसाट शहर जिल्हा काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस अनिस पटेल शहर जिल्हा काँग्रेस कमिटीचे अल्पसंख्यांक काँग्रेस कमिटीचे प्रदेश पदाधिकारी जावेद पठाण शहर जिल्हा काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस सौ मंजुताई लोखंडे प्रमोद सदाशिव रवी लोखंडे मजाज अझहर शेख प्राध्यापक पद्माकर कांबळे आनंद दाभाडे प्राध्यापक शीलवंत गोपनारायण फराज आबेदी शहबाज कादरी संजय जाधव मीनाज शब्बीर पटेल आधी पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते
What's Your Reaction?






