विभागीय लोकशाही दिनात 30 प्रकरणांवर सुनावणी

विभागीय लोकशाही दिनात 30 प्रकरणांवर सुनावणी प्रलंबित प्रकरणांचा तातडीने निपटारा करा. विभागीय आयुक्त दिलीप गावडे छत्रपती संभाजीनगर दि.13: लोकशाही दिनामध्ये नागरिकांकडून प्रशासनाकडे येणाऱ्या तक्रार अर्जांवर विहित कालमर्यादेत कार्यवाही करण्यासोबतच प्रलंबित प्रकरणांचा तातडीने निपटारा करा, असे निर्देश विभागीय आयुक्त दिलीप गावडे यांनी संबंधित विभागप्रमुखांना आज येथे दिले. विभागीय आयुक्तालयाच्या सभागृहात विभागीय आयुक्त श्री गावडे यांच्या अध्यक्षतेखाली आज लोकशाही दिन व महिला लोकशाही दिनाचे कामकाज पार पडले. त्यावेळी ते बोलत होते. तहसीलदार अरूण पावडे, नायब तहसीलदार गजानन नांदगावकर यांच्यासह महसूल, पोलीस, महापालिका, सहकार, भूमी अभिलेख, समाजकल्याण व ऊर्जा विभागाचे अधिकारी उपस्थित होते. लोकशाही दिनात नव्याने दाखल 5 प्रकरणे व यापूर्वीचे 25 प्रकरणे अशा 30 प्रकरणांवर सुनावणी झाली. एकूण प्रकरणापैकी 11 प्रकरणे निकाली काढण्यात आली आहेत. आयुक्त श्री. गावडे यांनी तक्रारदारांचे म्हणने ऐकुण घेतले. तसेच प्रकरणांच्या अनुषंगाने आवश्यक कार्यवाही करण्याच्या सूचना त्यांनी संबंधित विभागप्रमुखांना दिल्या.प्रलंबित सर्व प्रकरणांचा तातडीने निपटारा करा, असे निर्देश त्यांनी यंत्रणेला दिले. यावेळी विभागातील जिल्हानिहाय सबंधित विभागाचे अधिकारी उपस्थित होते.

Jan 13, 2025 - 22:20
 0
विभागीय लोकशाही दिनात 30 प्रकरणांवर सुनावणी
1 / 1

1. विभागीय लोकशाही दिनात 30 प्रकरणांवर सुनावणी

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow