मुलांसाठी मनपा प्रियदर्शनी विद्यालयात वॉटर बेल उपक्रम सुरु
चला चला पाणी पिण्याची वेळ झाली मुलांसाठी मनपा प्रियदर्शनी विद्यालयात वॉटर बेल उपक्रम सुरु औरंगाबाद दि.17मार्च (प्रतिनिधि) : छत्रपती संभाजीनगर महानगरपालिकेच्या शिक्षण विभागाच्या वतीने विद्यार्थ्यांसाठी सतत विविध नावीन्यपूर्ण उपक्रम राबविले जातात. याच अनुषंगाने मां. आयुक्त तथा प्रशासक जी श्रीकांत, उपायुक्त तथा शिक्षण विभाग प्रमुख अंकुश पांढरे, आणि मुख्याध्यापक संजीव सोनार यांच्या मार्गदर्शनाखाली, मनपा प्रियदर्शनी विद्यालयात वॉटर बेल उपक्रम सुरू करण्यात आला आहे. शाळेमध्ये लहान मुलं पाणी पिण्यास विसरतात किंवा अभ्यास व खेळणाऱ्या विषयांमध्ये रममाण असल्यामुळे पाणी प्यायला विसरतात हे टाळण्यासाठी महानगरपालिका केंद्रीय प्राथमिक व माध्यमिक विद्यालय प्रियदर्शनी मयूरबन कॉलनी या शाळेमध्ये वॉटर बेल हा उपक्रम सुरू करण्यात आला आहे. यांतर्गत ठराविक वेळेनंतर म्हणजेच एक तासानंतर मुलांना बजावून पाणी प्या अशी सूचना दिली जाते. त्यावेळेस वर्गशिक्षक सुद्धा त्यांच्यासोबत पाणी पितात. मुलांच्या शरीरात पाण्याची कमतरता असणे हे आजार होण्याचे मुख्य कारण आहे. आवश्यक तेवढे पाणी न पिल्याने तसेच आवश्यक पोषक तत्व न मिळल्याने आजार होण्याचा धोका निर्माण होतो. यासाठी मुलांना पाण्याच्या बॉटल सोबत ग्लुकोन डी किंवा सरबत ही मागवले जाते. मुले शाळेत येताना पाण्याची बॉटल सोबत आणतात. पण शाळेतून बरेचदा पाणी भरलेले बॉटल परत येत असते अशी पालकांची ही तक्रार असते. मुले शाळेत असली की पाणी पिण्याकडे दुर्लक्ष करतात. त्यामुळे त्यांना पाणी पिण्याचे आठवण करून देणे आवश्यक ठरते.ठराविक प्रमाणात नियमित पाणी प्यायले की आजारांना दूर ठेवता येते. आरोग्य ही चांगले राहते. त्यामुळे मुलांना पाणी पिण्याचे आठवण करून देणे तसेच त्यांना नियमित पाणी पिण्याची सवय लागावी यासाठी राज्यातील सर्व शाळांमध्ये वॉटर बेल उपक्रम राबवण्याचे शासनाने आदेश दिले होते. जिल्ह्यात सध्या उन्हाची तीव्रता वाढली आहे, विद्यार्थी दिवसभरातील जास्तीत जास्त वेळ शाळेत असल्याने पाण्याकडे दुर्लक्ष करतात, त्यामुळे डीहायड्रेशन होऊन विद्यार्थी आजारी पडतात. विद्यार्थ्यांनी ठराविक वेळेला पाणी प्यायला लावून तसेच सरबत किंवा ग्लुकॉन डी प्यायला लावून विविध आजारांपासून दूर ठेवू शकतो. जी मुले शाळेमध्ये ग्लुकॉन डी किंवा सरबत आणत नाहीत त्यांच्यासाठी एनर्जेल व ग्लुकॉन डी पावडर तयार ठेवलेली आहे. यासाठीचा हा उपक्रम सुरू केल्याचे मुख्याध्यापक संजीव सोनार यांनी सांगितले. पाणी पिण्यासाठी वेळ निश्चित करण्याचे शासनाने वेळापत्रक तयार केले आहे. मुख्याध्यापक संजीव सोनार शिक्षक तेजस्विनी देसले, रश्मी होनमुटे, स्वाती डिडोरे, प्रतिभा गावंडे, बाबू राठोड, पूजा सोनवणे, शुभांगी जमधडे, सफा पठाण, मोनिका चव्हाण हे विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करतात. त्यानुसार शाळेत पाणी पिण्याबाबत कार्यवाही केली जाते. विद्यार्थ्यांना स्वच्छ व थंड पाण्यासाठी वॉटर कूलर आहे. त्याचे फिल्टर दर महिन्याला स्वच्छ केले जाते.तसेच एनर्जेल,ORS उपलब्ध व्हावे यासाठी सर्व शिक्षकांनी शाळेमध्ये वरील साहित्य उपलब्ध करून घेतलेले आहे.

1.
What's Your Reaction?






