वाचन संकल्प महाराष्ट्राचा उपक्रम

वाचन संकल्प महाराष्ट्राचा उपक्रम महाराष्ट्र शासनाच्या “वाचन संकल्प महाराष्ट्राचा” या उपक्रमाअंतर्गत नवखंडा महिला कॉलेज/ मॉडर्न इंग्लिश स्कूलतर्फे विशेष कार्यक्रम आयोजित करण्यात आला. कार्यक्रमात प्रमुख पाहुणे म्हणून मार्टि कृती समिती महाराष्ट्राचे अँड. अझर पठाण, सर आसिफ, व अश्फाक अहमद यांचा सत्कार प्राचार्य मखदूम फारुकी व प्रा. विद्या प्रधान यांच्या हस्ते करण्यात आला. अँड. अझर पठाण यांनी विद्यार्थ्यांना वाचनाची आवड निर्माण करण्याचे आवाहन केले. तसेच, त्यांनी सांगितले की मार्टि अल्पसंख्याक संशोधन व प्रशिक्षण केंद्राच्या योजनांचा लाभ लवकरच प्रभावीपणे अंमलात येईल आणि या योजनांचा विद्यार्थ्यांनी नक्की लाभ घ्यावा. नवखंडा महिला कॉलेज चे प्राचार्य मखदूम फारुकी यांनी आपल्या भाषणात शिक्षणामुळे सकारात्मक बदल घडवून येतो आणि नकीच भविष्यात मार्टि मुळे अल्पसंख्याक विद्यार्थ्यांना रोजगार आणि नोकरी मध्ये मोठी संधी उपलब्ध होईल अशी आशा व्याक्त केली. सूत्र संचालन फिररदोस मॅडम यांनी केले यावेळी मोठ्या संख्यने विद्यार्थी व शिक्षक वर्ग उपस्थित होते

Jan 13, 2025 - 22:27
 0
वाचन संकल्प महाराष्ट्राचा उपक्रम
1 / 1

1. वाचन संकल्प महाराष्ट्राचा उपक्रम

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow