मनपा प्रियदर्शनी विद्यालयात साने गुरुजी कथामालेस सुरूवात

मनपा प्रियदर्शनी विद्यालयात साने गुरुजी कथामालेस सुरूवात छत्रपति संभाजीननगर (औरंगाबाद) दि.२५ डिसेंबर (प्रतिनिधि) साने गुरुजी यांच्या जयंतीनिमित्त मनपा प्रियदर्शनी विद्यालयामध्ये डोळस ग्रुप च्या वतीने साने गुरुजी यांच्या विचारांनी प्रेरित झालेले कथाकार, राष्ट्रसेवा दल , सानेगुरुजी कथामाला आंतरभारती या संस्थेचे कार्यकर्ते विजय शिंदे यांच्या प्रमुख उपस्थितीत व मुख्याध्यापक संजीव सोनार यांच्या अध्यक्षतेखाली साने गुरुजी कथा मालेस सुरुवात करण्यात आली आहे. मनपा प्रियदर्शनी विद्यालयात मा.आयुक्त तथा प्रशासक जी श्रीकांत, उपायुक्त अंकुश पांढरे यांच्या मार्गदर्शनाखाली विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास होण्यासाठी सातत्याने नवं नवीन विविध उपक्रम राबवले जातात. त्या अंतर्गतच साने गुरुजी कथामालेस सुरुवात करण्यात आली आहे. याप्रसंगी विजय शिंदे यांनी, साने गुरुजी यांच्या जीवनातील अनेक प्रसंग विद्यार्थ्यांना कथेच्या रूपातून सांगितले. साने गुरुजी यांचे विचार, विद्यार्थ्यांसाठी व समाजासाठी साने गुरुजींनी केलेले कार्य याची माहिती दिली. जिथून जे घेता येईल, ज्यांच्यापासून जे शिकाता येईल ते आदराने घ्या. आपले मन म्हणजे एक महान जादुगार व चित्रकार आहे, मन म्हणजे ब्रह्म सृष्टीचे तत्त्व आहे. आजकाल जगात भलत्याच गोष्टींना महत्त्व आले आहेत, वास्तविक ज्या गोष्टींना महत्त्व दिले पाहिजे त्यांना कोणीच देत नाही, मुख्य महत्त्व माणुसकीला आहे. मुख्याध्यापक संजीव सोनार यांनी अध्यक्षीय भाषणात विद्यार्थ्यांना मोबाईल व स्क्रीन टाईम पासून दूर नेण्यासाठी या कथामालेचा उपयोग होईल, त्यांच्यावर चांगले संस्कार होण्यासाठी, प्रत्येक महिन्यात वेगवेगळे लेखक, कवी याची भेट घडवून आणू असे सांगितले, त्यांनी आपल्या भाषणात साने गुरुजींची विचारांची माहिती सांगताना दुसऱ्याला हसणे फार सोपे असते, पण दुसऱ्या करिता रडणे फार कठीण असते, त्याला अंत:करण असावे लागते. करील मनोरंजन जो मुलांचे, जडेल नाते प्रभूशी तयाचे. जे सत्य असते ते काळाच्या ओघात टिकते, असत्य असते ते अदृश्य होते. असे सांगितले, कार्यक्रमाच्या आयोजनासाठी डोळस ग्रुपच्या सौ स्मिता तांबोळी,, सौ शैलजा मुंशी, शैलजा सोनपेठ कर, श्रीमती ज्योती भिलेगावकर, यांनी प्रयत्न केले. कार्यक्रमाचे संचालन तेजस्विनी देसले व आभार प्रदर्शन स्मिता मुळे यांनी केले.

Dec 26, 2024 - 00:07
 0
1 / 1

1.

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow

Er.M.A. Shakeel Senior Journalist,Social and Political activist Sportsman,Singer.District VicePresident Human Right Council of India.