मनपा प्रियदर्शनी विद्यालयात पहिला जागतिक ध्यान दिवस साजरा.

मनपा प्रियदर्शनी विद्यालयात पहिला जागतिक ध्यान दिवस साजरा. मनपा प्रियदर्शनी विद्यालयात पहिला जागतिक ध्यान दिवस साजरा *ध्यानधारणेमुळे अभ्यासाची एकाग्रता वाढते.....अनंत पंडित* औरंगाबाद दि.२१ डिसेंबर (प्रतिनिधि) आज २१ डिसेंबर २०२४ रोजी पहिला जागतिक ध्यान दिवस आहे.. संयुक्त राष्ट्र महासभेने (UNGA) ध्यान आणि त्याचे फायदे याबद्दल जागरुकता वाढवण्यासाठी हा दिवस घोषित केला. हा दिवस आधुनिक जीवनशैलीतील ध्यानाचे महत्त्व आणि त्याची मुळे प्राचीन ज्ञानात आहे हे ओळखतो. UNGA ची जागतिक ध्यान दिनाची घोषणा भारताने सहप्रायोजित केली होती आणि लिकटेंस्टीनने त्याची ओळख करून दिली होती. ही घोषणा अशा वेळी करण्यात आली जेव्हा जग संघर्ष आणि तणाव अनुभवत आहे आणि UNGA ने यावर जोर दिला की ध्यानामुळे लोकांना आंतरिक शांती आणि परिवर्तन प्राप्त होण्यास मदत होते. या अनुषंगाने आज मा.आयुक्त तथा प्रशासक जी श्रीकांत व उप आयुक्त तथा शिक्षण विभाग प्रमुख अंकुश पांढरे यांच्या मार्गदर्शनाखाली मुख्याध्यापक संजीव सोनार यांच्या अधिपत्याखाली विद्यार्थी व शिक्षक यांनी ध्यानदिन साजरा केला. याप्रसंगी प्रमुख वक्ते अनंत पंडित यांनी ध्यानाचे फायदे,आहेत यामध्ये मुख्यतः तणाव कमी करणे, संज्ञानात्मक आणि शारीरिक कार्ये सुधारणे, मन आणि शरीर यांच्यात सुसंवाद आणणे आणि चिंता सारख्या आधुनिक समस्यांना तोंड देण्यास मदत करणे., विद्यार्थ्यांची आकलन शक्ती वाढवणे, अभ्यासामधील एकाग्रता वाढवणे याविषयी माहिती दिली. याप्रसंगी सर्व शिक्षक, विद्यार्थी व पालक यांनी ध्यानधारणा केली. कार्यक्रमाचे संचालन तेजस्विनी देसले यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी सर्व शिक्षकांनी सहभाग घेतला.

Dec 22, 2024 - 02:32
 0

1.

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow

Er.M.A. Shakeel Senior Journalist,Social and Political activist Sportsman,Singer.District VicePresident Human Right Council of India.