बुरहानी इंग्लिश शाळेत वार्षिक स्नेहसंमेलन उत्साहात संपन्न

बुरहानी इंग्लिश शाळेत वार्षिक स्नेहसंमेलन उत्साहात संपन्न खुलदाबाद : खुलदाबाद येथील बुरहानी इंग्लीश शाळेचे वार्षिक स्नेहसंमेलन व पारितोषिक वितरण सोहळा उत्साहात पार पडला. यावेळी व्यासपीठावर संस्थेचे अध्यक्ष शेख मुजिबोद्दिन हफिजोद्दिन , उपाध्यक्ष शेख साद,  चिश्तिया कॉलेजचे प्राचार्य डॉ आसिफ झकरिया, प्राध्यापक डॉ शेख एजाज, समाजवादी पार्टीचे तालुकाध्यक्ष मिर्झा फारुक बेग, दर्गाह कमिटीचे अध्यक्ष एजाज अहमद,  दर्गा हद्दे खुर्दचे अध्यक्ष शेख शरफोद्दिन,  काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आबेद जागीरदार, शासकीय  कंत्राटदार शेख अय्युब, माजी सरपंच कागजीपुरा जमील अहमद, ग्रामपंचायत सदस्य कागजीपुरा अबू बकर,  पत्रकार हुसेन,  शेख मोहसीन, पत्रकार दिनेश सावजी, हाफिज आरिफ, हाफिज फैजान आदींसह मान्यवर उपस्थित होते.तसेच सांस्कृतिक कार्यक्रमाच्या प्रभारी शे समरीन इब्राहिम यांच्या मार्गदर्शनाखाली सदरील वार्षिक स्‍नेहसंमेलन यशस्‍वी झाले.       इयत्ता पूर्व प्राथमिक ( Jr KG) ते दहावीच्या विद्यार्थ्यानी या स्नेहसंमेलनात सहभाग नोंदविले होते.कार्यक्रमाच्या सुरुवातीला हुरेन फातेमा या विद्यार्थीनीने सुरह फातीहा वाचून अल्लाहचे नामस्मरण केले. तसेच उपस्थित प्रमुख पाहुण्यांचे स्वागत करून कार्यक्रमाला सुरुवात झाली. त्यानंतर शाळेच्या मुख्याध्यापिका खान रशिका यांनी प्रास्ताविक भाषणात शाळेचा वार्षिक अहवाल सादर केला. त्यांच्या भाषणात वर्षभरातील सांस्कृतीक कार्यक्रम पर्यावरण दिन, स्वातंत्र्य दिन,  बालदिवस, शिक्षक दिन, वॉल मॅगझिन, कॅन्टीन दिवस, विज्ञान प्रदर्शन तसेच शाळेतील विद्यार्थीनी जहागीरदार जरमिन, शेख रामीन, शेख युसरा परवीन यांनी वेगवेगळ्या मराठवाडा स्तरावरील सेमिनार आणि परीक्षेतील यशाबाबत माहिती दिली. पुढे बुरहानी इंग्लिश शाळेत विद्यार्थ्याना शिक्षणाबरोबर कुरआनच्या तिसाव्या अध्यायाचे मुखोद्गत केले जाते.व आतापर्यंत सहा विद्यार्थ्यांनी तिसाव्या अध्यायाचे मुखोद्गत केले याविषयी माहिती दिली. यानंतर विविध सामूहिक स्पर्धांमध्ये यश मिळविणाऱ्या विद्यार्थ्यांना मान्यवरांच्या हस्ते पारितोषिक वितरण करण्यात आले. या सांस्कृतिक कार्यक्रमात विद्यार्थ्यांनी  मराठी गीत देशभक्तिपर गीते, बालगीते, इस्लामिक गीत  आदी गीतांवर वैयक्तिक व सामूहिक नृत्य सादर केले. तसेच प्रसिद्ध शायर अबरार काशीफ यांची 'कयामत' ही  कविता सादर करून पालकांची मने जिंकली. कार्यक्रमासाठी विद्यार्थ्यांमध्ये उत्साह आणि‎ आनंदाचे वातावरण होते आणि शिक्षकांनी घेतलेल्या‎ मेहनतीचे प्रदर्शन या भव्य सोहळ्यातून दिसून आले.‎ मनोगतपर भाषणात प्रमुख पाहुणे म्हणून लाभलेले डॉ आसिफ जकरिया यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. विद्यार्थ्यांवर मूळ संस्कार हे प्राथमिक शिक्षकच करतात. आपल्या मुलांना मोबाइल व बाह्य खाद्यपदार्थांपासून दूर ठेवण्याचा संदेश त्यांनी पालकांना दिला. तसेच बुरहानी इंग्रजी शाळेतील  विद्यार्थ्यांना  शिक्षणाबरोबर अरबीचे  मूळ शिक्षण मिळत आहे. यासाठी संस्थेचे व शाळेचे कौतुक केले. अध्यक्षीय भाषणात शेख मूजीबोद्दिन हफिजोद्दिन यांनी शाळेतील सर्व मुले आपली आहेत असे समजून पालकांनी व शिक्षकांनी वागावे, जागरूक राहावे, स्पर्धा परीक्षांसाठी मुलांना तयार करावे, असे आवाहन  केले. तसेच या स्नेह संमेलनाच्या कार्यक्रमाला यशस्वी करण्यासाठी शाळेचे मुख्याध्यापिका, शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांची प्रशंसा केली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शेख शिजा व शेख जीनत या विद्यार्थिनींनी केले. वार्षिक स्नेह समारंभाचा समारोप शेख जेबा या विद्यार्थिनींच्या आभार प्रदर्शनाने झाला, ज्यात तिने आदरणीय पाहुण्यांचे व पालकांचे अमूल्य वेळ आणि उपस्थितीबद्दल आभार मानले. कार्यक्रमाच्या यशस्वीेतेसाठी उच्च माध्यमिक शाळेच्या मुख्यध्यापिका रशिका खान व प्राथमिक शाळेच्या मुख्यध्यापिका शेख शहाजहाँ तसेच फिरदोस, समरीन, अक्सा, अल्मास , फराह, सुनंदा , अल्फीया, रुबी,  तौहीद आदींनी  मेहनत घेतली.

Feb 4, 2025 - 01:53
 0
Burhani English School annual affection conference concluded with great enthusiasm
Burhani English School annual affection conference concluded with great enthusiasm Khuldabad: The annual affection conference and prize distribution ceremony of Burhani English School, Khuldabad was filled with enthusiasm. At this time Vyaspeethawar Sans
1 / 1

1. Burhani English School annual affection conference concluded with great enthusiasm

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow