नुकसानग्रस्त भागातील शेतीशिवाराची कृषिमंत्री दत्तात्रय भरणे यांनी केली पाहणी

नुकसानग्रस्त भागातील शेतीशिवाराची कृषिमंत्री दत्तात्रय भरणे यांनी केली पाहणी एकही शेतकरी शासनाच्या मदतीपासून वंचित राहणार नाही - कृषिमंत्री दत्तात्रय भरणे "काळजी करू नका, शासन आपल्या सोबत जालना, दिनांक 24 : जालना जिल्ह्यात अतिवृष्टीने शेतीचे नुकसान झाले आहे, अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानग्रस्त भागातील शेती शिवाराची आज कृषिमंत्री दत्तात्रय भरणे यांनी पाहणी केली. सोमठाणा, ता.बदनापूर, ढाकलगाव, ता. अंबड या गाव शिवारातील शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन "काळजी करू नका, शासन आपल्या सोबत आहे" असा धीर दिला. एकही शेतकरी शासनाच्या मदतीपासून वंचित राहणार नाही असे सांगतानाच तात्काळ पंचनामे करून शासनाला अहवाल सादर करा, असे निर्देश त्यांनी जिल्हा प्रशासनाला दिले. जालना जिल्ह्यातील सोमठाणा, ता.बदनापूर व ढाकलगाव, ता. अंबड शिवारात आज सकाळी कृषिमंत्री दत्तात्रय भरणे यांनी थेट बांधावर जात शेतकऱ्यांच्या अडचणी जाणून घेतल्या. यावेळी आमदार नारायण कुचे यांच्यासह महसूल, कृषि, पशुसंवर्धन, कृषि विद्यापीठ यांच्यासह संबंधित यंत्रणांचे प्रमुख अधिकारी उपस्थित होते. कृषिमंत्री श्री.भरणे संवाद साधताना म्हणाले, अतिवृष्टीमुळे शेतकरी बांधवाने कष्टाने पिकविलेल्या शेती पिकाचे नुकसान झाले आहे. जालना जिल्ह्यात नुकसानीचे क्षेत्र अधिक आहे. कपाशी, सोयाबीन यासह इतर पिकांचे नुकसान मोठ्या प्रमाणात आहे. पशुधन तसेच घराची पडझड झाली आहे. जिल्हा प्रशासनाने संबंधित यंत्रणांसह तातडीने पंचनामे करून राज्य शासनाकडे अहवाल सादर करावा. अहवाल प्राप्त होताच तातडीने नुकसान भरपाई देण्यात येईल. एकही शेतकरी मदतीपासून वंचित राहणार नाही, काळजी करू नका, शासन आपल्या सोबत आहे, असा धीर त्यांनी शेतकऱ्यांना दिला. जालना जिल्ह्यात ऑगस्ट-सप्टेंबर महिन्यात मोठ्या प्रमाणात क्षेत्र बाधित झाले आहे. गेल्या आठ-दहा दिवसात मोठ्या प्रमाणात शेती पिकाचे नुकसान झाले आहे. शेतीशिवारात पिके पाण्याखाली आहेत, तर कुठे पीक वाहून गेल्याचे दिसत आहे. शेतकऱ्यांना कोणत्याही परिस्थितीत तातडीने मदत पोहचलीच पाहिजे म्हणून जिल्हा प्रशासनाने तत्परतेने पंचनामे करून अहवाल सादर करावा, असे निर्देशही त्यांनी यंत्रणेला दिले. राज्याच्या कृषिमंत्री म्हणून आपण सर्व शेतकरी बांधवांच्या पाठीशी ठामपणे उभे आहोत. तसेच शासनाची भूमिका शेतकऱ्याला आधार देण्याचीच असून नुकसानीचे पंचनामे होऊन प्रस्ताव सादर होताच मदत तत्परतेने मदत मिळेल, संकटाच्या काळात आपण सर्व शेतकरी बांधवांच्या पाठीशी उभे राहूयात असेही ते म्हणाले. यावेळी शासनाच्या विविध विभागांचे प्रमुख, लोकप्रतिनिधी, शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Sep 24, 2025 - 22:38
Sep 24, 2025 - 22:38
 0

नुकसानग्रस्त क्षेत्रों का कृषि मंत्री दत्तात्रेय भरणे ने किया दौरा

“कोई भी किसान सरकार की मदद से वंचित नहीं रहेगा” – कृषि मंत्री दत्तात्रेय भरणे

“चिंता मत कीजिए, सरकार आपके साथ है…”

जालना, 24 सितम्बर : जालना ज़िले में अतिवृष्टि (अत्यधिक बारिश) के कारण फसलों को भारी नुकसान हुआ है। इस आपदा से प्रभावित खेतों और शिवार का आज कृषि मंत्री दत्तात्रेय भरणे ने दौरा किया। बदनापुर तालुका के सोमठाणा और अंबड तालुका के ढाकलगांव सहित अन्य गांवों में जाकर उन्होंने किसानों से सीधे संवाद किया और कहा – “चिंता मत कीजिए, सरकार आपके साथ खड़ी है। कोई भी किसान सरकार की मदद से वंचित नहीं रहेगा।”

उन्होंने ज़िला प्रशासन को निर्देश दिए कि तुरंत पंचनामा कर रिपोर्ट राज्य सरकार को भेजी जाए, ताकि किसानों को समय पर मुआवजा मिल सके।

सुबह के समय कृषि मंत्री भरणे स्वयं खेतों पर पहुंचे और किसानों की समस्याएँ सुनीं। इस अवसर पर विधायक नारायण कुचे सहित राजस्व, कृषि, पशुपालन और कृषि विश्वविद्यालय के अधिकारी भी मौजूद थे।

कृषि मंत्री ने कहा – “अतिवृष्टि के कारण किसानों की मेहनत से उगाई गई कपास, सोयाबीन सहित अन्य फसलों को भारी नुकसान हुआ है। पशुधन और कई घर भी क्षतिग्रस्त हुए हैं। ज़िला प्रशासन तत्काल पंचनामे कर राज्य सरकार को रिपोर्ट दे। रिपोर्ट मिलते ही नुकसान की भरपाई दी जाएगी।”

उन्होंने आगे कहा कि अगस्त–सितंबर महीने में जालना ज़िले में बड़ी संख्या में खेत प्रभावित हुए हैं। कई जगह फसलें पानी में डूब गईं, तो कहीं बह भी गईं। “किसी भी स्थिति में किसानों तक तात्कालिक मदद पहुंचनी ही चाहिए,” यह निर्देश भी उन्होंने संबंधित विभागों को दिए।

अंत में भरणे ने कहा – “राज्य के कृषि मंत्री के रूप में मैं सभी किसानों के साथ मजबूती से खड़ा हूँ। सरकार का संकल्प है कि किसी भी किसान को संकट की घड़ी में अकेला नहीं छोड़ा जाएगा। पंचनामे के बाद तुरंत मुआवज़ा दिया जाएगा।”

इस मौके पर शासन के विभिन्न विभागों के अधिकारी, जनप्रतिनिधि और बड़ी संख्या में किसान उपस्थित थे

क्या आप चाहेंगे कि मैं इसे समाचार लेख की तरह (हेडलाइन, उपशीर्षक और छोटे पैराग्राफ़ के साथ) बनाऊँ ताकि यह अख़बार या प्रेस रिलीज़ में सीधे इस्तेमाल किया जा सके?

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow