रोबोट तंत्रज्ञानाच्या मदतीने २९ नळ कनेक्शन नियमित
रोबोट तंत्रज्ञानाच्या मदतीने २९ नळ कनेक्शन नियमित छत्रपती संभाजी नगर दि.१३ मार्च छत्रपती संभाजी नगर महानगरपालिकेच्या अनाधिकृत नळ शोधक विशेष पथकाने काल दि.१२ मार्च रोजी गल्ली no. ८, सुरेवाडी येथे अनधिकृत नळ कनेक्शन पाहणी केली होती.या ठिकाणी Robot तंत्रज्ञान वापरून शोधण्यात आलेल्या अनधिकृत नळ आणि ferrule (अधिक पाणी येण्यासाठी जलवाहिनी मध्ये खोलवर पाईप टाकून चुकीच्या पद्धतीने नळ घेतलेले आहेत म्हणून हे सगळे ferrule बंद करून येथील नागरिकांना रीतसर नोटीस देण्यात आल्या होत्या.सदर ठिकाणी नळ अधिकृत करून घेऊन आणि ferrule (चुकीच्या पद्धतीने नळ घेतलेला) धारकां कडून प्रत्येकी ₹५०००/- दंड वसूल करण्यात आला.असे एकूण ४ जणांना ₹२००००/- आणि सोबत २९ अनधिकृत नळ कनेक्शन संबंधित नागरिकांनी नळ अधिकृत करून घेऊन एकूण *₹१०७७२५*/- चा कर प्राप्त झाला. यापुढेही संपूर्ण शहरामध्ये Robot मार्फत अशाच अनधिकृत नळां वर कारवाई सुरू असणार आहे. सदरील कारवाई मां.आयुक्त तथा प्रशासक जी श्रीकांत यांच्या आदेशानुसार कार्यकारी अभियंता के. एम. फालक यांच्या मार्गदर्शनाखाली उप अभियंता लक्ष्मीकांत कोटकर, पथक अभियंता रोहीत इंगळे, कनिष्ठ अभियंता भूषण देवरे, आनंद राजपूत, लाईनमन शुभम तसेच सोबत पथक कर्मचारी यांनी पार पाडली.

1.
What's Your Reaction?






