श्रीमती राधाबाई शिंदे विद्यालयाची शैक्षणिक सहल संपन्न

मुजीब खान -कन्नड (प्रतिनिधी) : : राधाबाई शिंदे विद्यालय हस्ता .कन्नड शैक्षणिक सहल दि. २६ ते २८ डिसेंबर दरम्यान कळसुबाई शिखर -भंडारदरा -शिर्डी अशी यशस्वीरित्या पार पडली. या सहलीमध्ये इयत्ता ०८ ते १२ वी पर्यंत चे ८४ विद्यार्थी व ०८ शिक्षक समुहाने महाराष्ट्र परिवहन मंडळाच्या दोन बस ने सहभागी झाले होते. या एकदिवसीय सहलीत विविध ऐतिहासिक, भौगोलिक व सांस्कृतिक वास्तूचे विद्यार्थ्यांना दर्शन झाले. विद्यार्थ्यांच्या ज्ञानात भर पाडण्यासाठी वैशिष्ट्यपूर्ण स्थळांची निवड सहलप्रमुखांनी सहलीसाठी केली होती. या सहली दरम्यान महाराष्ट्राची एव्हरेस्ट असलेले व सर्वात मोठे शिखर असलेल्या "कळसुबाई शिखर" भटकंतीचा विद्यार्थ्यांनी अनुभव घेतला. सहली दरम्यान निसर्ग जैव विविधता, भौगोलिक रचना, याबाबत सविस्तर मार्गदर्शन करण्यात आले. हा उपक्रम यशस्वी करण्यासाठी संस्थेचे संस्थापक अध्यक्ष आबासाहेब शिंदे, सहसचिव ऋतुपर्ण शिंदे, मुख्याध्यापक चोंधे, सहल प्रमुख बिडवे व सर्व शिक्षक वृंद व शिक्षकेतर कर्मचारी तसेच पालक यांनी परिश्रम घेतले.

Jan 9, 2025 - 00:25
 0
श्रीमती राधाबाई शिंदे विद्यालयाची शैक्षणिक सहल संपन्न
1 / 2

1. श्रीमती राधाबाई शिंदे विद्यालयाची शैक्षणिक सहल संपन्न

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow