महानगरपालिका आयोजित कर्मचारी टी -२० क्रिकेट स्पर्धा आता अंतिम टप्प्यात
महानगरपालिका आयोजित कर्मचारी टी -२० क्रिकेट स्पर्धा आता अंतिम टप्प्यात उपांत्यफेरीच्या सामन्यांची रंगत वाढली छत्रपती संभाजी नगर दि.१७ मे छत्रपती संभाजी नगर महानगरपालिकेच्या वतीने कर्मचारी टी -२० स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. मा.आयुक्त तथा प्रशासक जी श्रीकांत यांच्या संकल्पनेनुसार एम जी एम क्रिकेट मैदानावर या क्रिकेट स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. आज झालेल्या दोन सामन्यात शहर पोलीस ब आणि एमजीएम विद्यापीठ या दोन संघांनी सेमी फायनल(उपांत्य फेरी)मध्ये प्रवेश केला आहे. आज सकाळी शहर पोलीस ब संघ व महावितरण शहर विभाग यांच्यात झाला. शहर पोलीस संघाने नाणेफेक जिंकत प्रथम फलंदाजी करताना निर्धारित 20 षटकांमध्ये 152 धावा केल्या. यात पोलीस कर्मचारी मोहम्मद आझम यांनी 57 धावा केल्या आसिफ शेख यांनी 40 धावा तर शेळके यांनी 55 धावा केल्या. महावितरण चा सर्वसंघ 112 धावांतच गारद झाला.हा सामना शहर पोलीस ब संघाने 40 धावांनी जिंकला शहर पोलीस ब च्या वतीने गोलंदाजी करताना एपीआय सचिन मिरगे यांनी चार षटकात दोन गडी बाद केले तर जीवन बावस्कर याने तीन गडी बाद केले. तीन गडी बाद करणारा जीवन बावस्कर हा सामनावीर पुरस्काराचा मानकरी ठरला. एमजीएम मैदानावर आज दुसऱ्या अन्य एका सामन्यात एमजीएम विद्यापीठ आणि ऑल डॉक्टर्स यांच्यात सामना झाला यामध्ये एमजीएम विद्यापीठाने ऑल डॉक्टर्स संघावर विजय मिळवून सेमी फायनल मध्ये प्रवेश केला. एमजीएम विद्यापीठाने प्रथम फलंदाजी करताना 159 धावा केल्या यामध्ये सागर शेवाळे यांनी 39 व अमर असोलकर 28 धावा यांचे योगदान महत्वाचे ठरले. 159 धावाचे आव्हान घेऊन ऑल डॉक्टर्स संघ मैदानात उतरला परंतु त्यांचा सर्व संघ वीस षटकात फक्त 98 धावाच करू शकला एमजीएम विद्यापीठातर्फे रहीम खान यांनी दोन गडी बाद केले तर डॉ. मयूर राजपूत यांनी तीन गडी बाद केले .तीन गडी बाद करणारा डॉ. मयूर राजपूत हा सामनावीर ठरला. आता उपांत्य फेरीचे सामने आणखीनच रंगतदार होणार आहेत.प्रेक्षक या सर्व सामन्यांना भरभरून प्रतिसाद देत आहेत. यावेळी स्पर्धा संयोजन समिती चे क्रीडा अधिकारी संजय बालया, क्रीडा शिक्षक फिरोज खान, क्रीडा समिती सदस्य सुंदर खरात आणि क्रीडा समिती आयोजन तांत्रिक समिती चेअरमन सय्यद जमशेद हे उपस्थित होते.
1.
What's Your Reaction?

