पोलीस स्थापना दिवसानिमित्त अंधानेर प्रशालेत जिल्हास्तरिय परीक्षा संपन्न
मुजीब खान कन्नड( |प्रतिनिधी). : शालेय विद्यार्थ्यांनी अभ्यास आणि खेळ या दोनच बाबींवर आपले लक्ष केंद्रित केले तर जीवनात कोणत्याही प्रकारच्या कठीणतल्या कठीण परिस्थितीला ते सामोरे जाऊन अवकाशाला गवसनी घालू शकतात.मात्र त्याच सोबत आता सायबर सुरक्षा बाबत विद्यार्थ्यांसह पालक आणि शिक्षकांतही जागृती असणे ही काळाची गरज असल्याचे प्रतिपादन कन्नड शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक आर.बी. सानप यांनी दी.६ रोजी अंधानेर प्रशालेत केले. पोलीस अधिक्षक कार्यालय व पोलीस ठाणे कन्नड शहर यांच्या वतीने पोलीस स्थापना दिवसाचे अनुषंगाने इयत्ता आठवी ते दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी विद्यार्थांमध्ये सायबर सुरक्षा संदर्भात जनजागृती होण्याचे दृष्टीकोनातुन “सायबर सुरक्षा जिल्हयास्तरीय स्पर्धा परिक्ष व मार्गदर्शन सत्राचे " आयोजन करण्यात आले होते.या प्रसंगी विद्यार्थ्यांना मार्गदर्शनपर बोलत होते.यावेळी प्रशालेचे मुख्याध्यापक राजीव जाधव,सपोनी.चांद मेंढके,पोकॉ.संजय आटोळे,,गुप्त वार्ता चे प्रदीप चव्हाण,पोकॉ दिनेश खेडकर यांची प्रमुख उपस्थिती होती. प्रस्ताविक तसेच सूत्रसंचल संजय केवट यांनी केले.सपोनि चांद मेंढके यांनी विद्यार्थ्यांना सायबर सुरक्षितात यावर मार्गदर्शन केले.सदर स्पर्धा परिक्षेचा मुख्य विषय हा सोशल मिडीया व्हॉट्सॲप, फेसबुक, इंस्टाग्राम, ऑनलाईन गेम यांच्या माध्यमांतुन होणारी फसवणूक,तसेच सोशल मिडीयाचा सवयी (ॲडीकशेन) यावर आधारित होती यामाध्यमांतुन शालेय स्तरावरिल विद्यार्थी,पालक तसेच शिक्षक यांचे मध्ये जनजागृती होवुन मुले असे सायबर धोक्यापासुन वेळीच सावध होवुन कोणत्याही सायबर प्रलोभनास बळी पडणार नाही तसेच त्याचे अधीन जावुन स्वत:चा जिव धोक्यात घालणार नाहीत. या स्पर्धा परिक्षेत ग्रामीण सहभागी विद्यार्थ्यांना सायबर विषयावर विस्तृत माहिती होवुन मुलांना सायबर तसेच सोशल मिडीयाचा याचा वापर, त्याद्वारे होणारी फसवणूक व फसवणूकीचे प्रकार याचे अद्यावत ज्ञान होईल या उद्देशाने उपक्रम राबविण्यात आला.प्रथम,द्वितीय, तृतीयअसे विद्यार्थ्यांचे गुणवत्तेनुसार गुणांकन करण्यात येणार असुन त्यांना पोलीस अधीक्षक कार्यालयाकडुन प्रमाणपत्र, ट्राफी,असे पारितोषिक प्रदान करण्यात येणार आहेत.कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी प्रशालेचे आर सी पाटील,एन एच दांगट,मच्छिन्द्र डिघोळे, दिपक सोनवणे,सतीश कापुरे,रामभाऊ गुढेकर,सुयश अहिरराव,जावेद पटेल,रुपाली सोनवणे,मीनाक्षी बडग,आरती बागुल,सीमा बोडखे,शामकांत येवले, योगेश जाधव,भागीनाथ भडांगे,शेख अष्पाक आदींनी परिश्रम घेतले.आभार दिपक सोनवणे यांनी मानले.

2. भाजप नेते रमेश बिदूडी यांना शहर जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीने जोडे मारो आंदोलन व रमेश बिदुडी यांची भाजपातून हकालपट्टी करावी
छत्रपती संभाजी नगर (औरंगाबाद)
भाजप नेते रमेश बिदूडी यांना शहर जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीने जोडे मारो आंदोलन व रमेश बिदुडी यांची भाजपातून हकालपट्टी करावी
दिवस अगोदर भाजपचे नेते कालका विधानसभा मतदारसंघाचे भाजपचे उमेदवार रमेश बिदुडी यांनी देशाच्या नेत्या व खासदार प्रियंका गांधी यांच्या बद्दल अपमान जनक वादग्रस्त वक्तव्य केले म्हणून आमच्या महिलांच्या भावना दुखावल्या त्याकरिता आंबेडकर नगर येथे भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करून रमेश बिदुडी यांच्या प्रतिमेला जोडे मारो (चप्पल मारो )आंदोलन शहर जिल्हा काँग्रेस सरचिटणीस सौ मंजुताई लोखंडे नेतृत्वाखाली आंदोलन घेण्यात आले
भाजपचे नेते व दिल्ली विधानसभा उमेदवार रमेश बिजोडी यांनी खा प्रियंका गांधी व यांच्यासह दिल्लीच्या मुख्यमंत्री आतिशी यांच्याबद्दलही अतिशय ने बाप बदलला म्हणून वादग्रस्त वक्तव्य केलं या आदी ही मुस्लिम समाजाबद्दल हा शब्द वापरले होते रमेश बिदुडी हे भाजपचे नेते असून वारंवार महिलांचा अल्पसंख्याक समाजाचा अपमान करतात म्हणून भाजपाने नेत्यांनी त्यांना उमेदवारी नकारून त्यांची पक्षातून हाकालपट्टी करावी अशी मागणी महिलांच्या वतीने करण्यात आली यावेळी महिलाओ के सन्मान में काँग्रेस मैदान मे प्रियंका गांधी तुम संघर्ष करू हम तुम्हारे साथ है रमेश बिदोडी मुर्दाबाद रमेश बिदुडी माफी मांगो अशा घोषणा देण्यात आल्या
यावेळी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी सरचिटणीस डॉ जफर अहमद खान महाराष्ट्रा प्रदेश अल्पसंख्यांक काँग्रेसचे उपाध्यक्ष इब्राहिम पठाण काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते जगन्नाथ काळे शहर जिल्हा अल्पसंख्याक काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष मोईन इनामदार शहर जिल्हा काँग्रेस कमिटीचे कार्याध्यक्ष डॉ अरुण शिरसाट शहर जिल्हा काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस अनिस पटेल शहर जिल्हा काँग्रेस कमिटी ज्येष्ठ नेते आकिफ रवी रेखाताई राऊत युवक काँग्रेसचे प्रदेश सचिव इरफान इब्राहिम पठाण प्रतापसिंह होलिया मंजूताई लोखंडे अरुणाताई लांडगे रवी लोखंडे परविन बाजी देशमुख अकलाक पटेल शकुंतला ताई खरात, रंजनाताई साळवे शारदा बाई मगरे, कडूबाई मस्के, रेखा बाई लहाने, कौतिक बाई कसबे, रेखा जाधव, संगीता जाधव, छाया बाई त्रिभुवन, मैना आपुट, सुमन बाई साळवे, लता बाई नितनवरे, भंडारे बाई, मीनाज पटेल संजय जाधव रियाज पटेल जोडे मारून आंदोलनामध्ये महिलांची संख्या मोठ्या प्रमाणात होती कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी रेखाताई राऊत व रवी लोखंडे यांनी परिश्रम घेतले
What's Your Reaction?






