नववर्षाच्या स्वागतासाठी फटाक्यांची आतषबाजी नकोच !

मुजीब खान -कन्नड : फटाके आणि हानी यांचे समीकरण ठरलेले असताना भारतात फटाक्यांना इतके का महत्व दिले जात आहे हे न उलगडणारे कोडे आहे दूषित हवा आणि वाढलेले प्रदूषण यांच्या डोक्यावर सावट असताना यंदा दिवाळीत प्रचंड प्रमाणात फटाके फोडले गेले परिणामी अनेक ठिकाणी आगीला लागण्याच्या घटना घडल्या श्वसन विकार असणाऱ्यांना वृद्धांना गर्भवती महिलांना मुक्या प्राण्यांना मोठ्या प्रमाणात त्रास सहन करावा लागला यातून लहान मुले आणि तरुणही सुटले नाहीत न्यायालयाने दिवाळीत फटाके फोडण्याला वेळेचे बंधन घालून दिले असताना त्याची अंमलबजावणी केवळ कागदावरच राहिली नववर्षाच्या स्वागतार्थ ३१ डिसेंबरच्या रात्री दरवर्षी देशभरात मोठ्या प्रमाणात फटाके फोडले जातात शहरासारख्या ठिकाणी हे प्रमाण खूपच असते मोठ्या आवाजासह धूर निर्माण करणारे फटाके या रात्री प्रचंड प्रमाणात फोडले जातात धनी प्रदर्शनासह वायू प्रदूषणात भर घालणाऱ्या या आतषबाजीवर सरकारकडून अथवा न्यायालय कडून निर्माण का घातले जात नाहीत हाही एक प्रश्नच आहे भारतीय संस्कृतीचा भाग नसलेल्या फटाक्यांचा आतिषबाजीला भारतात नको तेवढे महत्व दिले जाते लग्न समारंभ मिरवणुका राजकीय सभा यात्रा वाढदिवस खेळांच्या स्पर्धा निवडणुका यांसारख्या प्रसंगी सरासपणे फटाके फोडले जातात फटाक्यांच्या आवाजामुळे आणि धुरामुळे सामान्य नागरिकांसह पशुपक्ष्यांनाही त्रास सहन करावा लागतो गर्भवती स्त्रिया लहान मुले रुग्ण यांना या आतिषबाजीचा अधिक त्रास सहन करावा लागतो याशिवाय फटाके बनवणाऱ्या कारखान्यांमध्ये आणि गोदामामध्ये वर्षभर कुठे ना कुठे आगी लागून जीवित आणि वित्तहानीच्या घटना घडल्याचे वृत्त वाचनात येते नवीन वर्षात तरी सरकार याबाबत गांभीर्याने विचार करणार आहे का ?

Dec 31, 2024 - 16:05
 0

1.

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow