कन्नड नगर परिषदेला कन्नड शहराचा विसर. मुख्याधिकारी कार्यालयात राहत नाही
मुख्याधिकारी कार्यालयात राहत नाही मुजीब खान कन्नड. : कन्नड दि ३१ शिवसेना ठाकरे गटाचे वतीने दिनांक ३० रोजी तहसील कार्यालय कन्नड येथे तहसीलदार यांना एक निवेदन देऊन कन्नड नगरपरिषद हद्दीतील नागरिकांच्या समस्या दूर करण्यास केली विनंती. मुख्याधिकारी कार्यालयीन वेळात कार्यालया मध्ये न भेटल्यामुळे शिवसैनिकांनी कन्नड तालुक्याचे तहसीलदार तथा दंडाधिकारी यांच्याकडे धाव घेतली. कन्नड शिवसेना शहर प्रमुख डॉ सदाशिव पाटील यांचे अध्यक्ष खाली तहसीलदार विद्याचरण कडवकर यांना एक निवेदन दिले. या निवेदन मध्ये नमूद केले आहे की गेल्या सहा महिन्यापासून कन्नड शहराची दुरवस्था झाली आहे. नगरपालिका प्रशासनाने अजिबात लक्ष नाही कन्नड शहरातील गल्लोगल्ली घाणीचे साम्राज्य पसरला आहे. पिण्याचे पाण्याचे नियोजन नाही स्वच्छ पाणी येत नाही नळपट्टी संपूर्ण वर्षाचे घेतात परंतु महिन्यातून तीन ते चारच वेळेस पाणी येते. त्यामुळे नळपट्टी कमी करण्यात यावे व शहरवासीयांना स्वच्छ व नियमित पाणी देण्यात यावे. संपूर्ण शहरात पाईपलाईन जागोजागी फुटलेली आहे ती दुरुस्त करण्यात यावी. नगरपालिका चे पाईप लाईनचे वाल नादुरुस्त आहे ते दुरुस्त करून नागरिकांना पाणी वेळेवर देण्यात यावे. पथदिवे बंद आहे ते चालू करण्यात यावे. कन्नड शहराचे मुख्य प्रवेशद्वारावर पिशोर रोड, हिवरखेडा रोड, चाळीसगाव रोड, मकरंदपुर रोड, माळीवाडा बाजार पट्टी या रोडवर घाणिचे साम्राज्य आहे. कन्नड नगरपालिका हद्दीतील मुख्य रोडवर बाजारपेठ मध्ये मोकाट जनावर बसलेले असतात. सर्व राजकीय पक्षाने निवेदन देऊन सुद्धा कारवाई का होत नाही असे या या निवेदन द्वारे विचारणा करण्यात आलेली आहे. मोकाट कुत्र्यांचा बंदोबस्त करण्यात यावा. चाळीसगाव रोड ते कन्नड बस स्टँड, मकरंदपुर पूल व पिशोर नाका ते पिशोर रोड टेलिफोन ऑफिस या ठिकाणी डीवाईडरच्या दोन्ही बाजूने घाण व माती साचलेली आहे ती स्वच्छ करण्यात यावी. नसताच शिवसेना ठाकरे गटाचे वतीने झोपी गेलेल्या नगरपालिका प्रशासनाला जागी करण्यासाठी ढोल बजाव आंदोलन करण्यात येईल असा इशारा यावेळेस डॉ सदाशिव पाटील यांनी दिला. या निवेदनावर शिवसेना शहर प्रमुख डॉ सदाशिव पाटील, उपतालुका प्रमुख शिवाजी थेटे, कामगार आघाडीचे शहराध्यक्ष किसन भालेराव, उपशहर प्रमुख चंद्रकांत लाडे, सलमान शेख, हिंदराज लकवाल, सचिन काळे, लक्ष्मीकांत सुरे, विभाग प्रमुख प्रकाश काचोळे, उदय सोनवणे, सागर सोनवणे, नाना वाळुंजे, राम राजपूत, प्रवीण राठोड, भाऊसाहेब सूर्यवंशी, गणेश मोरे यांच्या स्वाक्षरी आहे.
1.
What's Your Reaction?






