प्रभारी मुख्याध्यापक व शिक्षकांच्या मनमानी कारोभारा विरोधात गट शिक्षणाधिकारीकडे तक्रारजि.प.माध्यमिक शाळा टाकळी रा.रा.
खुलताबाद तालुक्यातील मौजे टाकळी रा. रा. येथील जि. प. प्रशाला टाकळी रा.रा.या शाळेचे प्रभारी मुख्याध्यापक वसंत फुलसिंग राठोड व इतर शिक्षकांच्या विरुद्ध पालकांनी तक्रार केल्यानंतर गट शिक्षणाधिकारी पं.स. खुलताबाद यांनी दि.07.03.2025 ला अक्स्मिक भेट दिली असता त्यात प्रभारी मुख्यधापक व सर्व शिक्षक ऊशिरा आले, शालेय परिसर स्वच्छ नव्हता, मुलींचे शौचालय स्वच्छ नव्हते व वापरत नव्हते, शाळेचे कोणतेच रेकॉर्ड अध्यावत व व्यवस्थित नव्हते, शासकीय अभिलेखे पूर्ण नव्हते, प्राभरी मुख्याधपक उपस्थित असताना वर्ग 5 वी ते 9 वी पर्यंतची गुणवत्ता तपासली असता तेव्हा मुलांना साधे मराठी, इंग्रजी वाचन आले नाही, गणित करता आले नाही, बाराखडी वाचता आले नाही, मुलांची संख्या फारच कमी होती , विद्यार्थ्यांचे गैरहजर बाबत शिक्षकानी पालकांशी संपर्क साधला नाही, प्रभारी मुख्याध्यापक यांनी देखील याबाबत कुठलीही दखल घेतली नाही अशा जवळ जवळ 22 पेक्षा अधिक तृट्या अढळल्यामुळे गट शिक्षणाधिकारी यांनी पं.स. खुलताबाद यांनी प्रभारी मुख्याध्यापकासह शिक्षकांना दि.26.03.2025 ला कारणे दाखवा नोटीस बजावली व दि.21.04.2025 ला वरिष्ठांना अहवाल तयार तयार करुन पाठविला की,प्रभारी मुख्याध्यापक वसंत फुलसिंग राठोड यांची तात्काळ तक्रारी बदली करण्यात यावी कारण ते 32 वर्षापेक्षा जास्त कालावधी पासून याच प्रशालेत विवीध पदांवर कार्यरत असल्या कारणाने त्यांच्या कामात शिथिलता आलीअसून गावातील अनेक नागरिक कंटाळले आहे नागरिकांनी कंटाळून शेवटी आपल्या मुलांना इतर जवळच्या प्रवेश घेऊन दिला आहे प्रभारी मु.अ.वसंत फुलसिंग राठोड जो पर्यंत या शाळेत आहे तो पर्यंत नागरीक या शाळेत मुलांचा प्रवेश घेनार नाही असे एक मताने ठरविले आहे आताही या प्रभारी मु.अ.वसंत फुलसिंग राठोड मुळे विद्यार्थ्यांचे शैक्षिणक नुकसान झाले आहे व इतर शिक्षकांना सुधारन्याची संधी दिली. असा चौकशी अहवाल मा. शिक्षण अधिकारी (प्रा.) जि.प. छ.संभाजीनगर यांच्याकडे पाठविण्यात आला आहे.व संबंधित वरिष्ठ अधिकारी यांच्याकडे प्रभारी मुख्याध्यापक वसंत फुलसिंग राठोड यांच्या बदलीच्या हालचाली वेगात सुरू झाली असल्याने त्यांनी शा. व्य. स. सदस्य संजय जाधव यांना मॅनेज करण्याचा खूप प्रयत्न केला ते बळी पडले नाही म्हणून त्यांनी दि.5.07.2025 ला ते आणि कौशल्य विकास चे कार्यरत शिक्षक मोईन जब्बार पठाण यांच्या दुचाकीवर रात्री 8.00 ते 9.00 वा.काटशेवरी ते टाकळी रा.रा.कडे प्रवास करत असतना भगतवाडी च्या टर्न पुढे दोन तोंड बांधलेले गुंड पाठीमागुन चालू दुचाकीरून त्यांचा पाठीवर दांड्याने मारले व त्यांचा मोबाईल हिसकावून नेला व कौशल्य विकास चे कार्यरत शिक्षक मोईन जब्बार पठाण हे मारहाण झाली त्या वेळी त्या ठिकाणावरून टाकळी रा.रा.ला त्यांना एकट्याला सोडून गेले मग संजय जाधव यांनी मित्राला बोलावून घेतले मित्राच्या मोबईलने 100 वर फोन करून कळवल्यावर त्यांनी नजीकच्या पो. स्टे. खुलताबाद येथे तक्रार देण्या संबंधी सूचना केली व रात्री 11 वा.पो.स्टे. खुलताबाद येथे अज्ञात गुंडांनी संजय जाधव व शिक्षक मोईन जब्बार पठाण यांना मारहाण बाबत तक्रार केली त्यात गुंडांना पाठवणारे संशयत प्रभारी मुख्याध्यापक वसंत फुलसिंग राठोड यांचे नाव दिले नंतर मेडिकल औषध उपचार साठी ग्रामीण रुग्णालय खुलताबाद येथे औषध उपचार घेऊन एक प्रत पो. स्टे. खुलताबाद येथे दिली नंतर मित्राने त्यांना टाकळी रा.रा. येथे नेऊन सोडले व दि.23.07.2025 ला दुपारी दोन वा.वेळी मुलगा सुशील संजय जाधव याला काही विद्यार्थ्यांनी गळा दाबून बुक्याने मारहाण केली यापुढे वयक्तिक लक्ष देऊ असे लेखी पत्र शा. व्य. स. सदस्य संजय जाधव यांना दिले आहे व शा. व्य. स. सदस्य संजय जाधव यांचे म्हणणे आहे की अशा कामचुकार व कर्तव्यात कसूर करणाऱ्या प्रभारी मुख्याध्यापक वसंत फुलसिंग राठोड यांची तात्काळ तक्रारी बदली करण्यात यावी अशी मागणी आहे कारण टाकळी गावातील अनेक नागरिक व पालकांनी 2019 ,2023 ला व विशेष ग्रामसबभेत एक मताने ठराव पास करुन 2oo पेक्षा अधिक नागरिक व पालकांच्या सह्यने बदलीचा अर्ज पाठविला होता या सर्व बाबींचा विचार करून वरिष्ठांनी प्रभारी मु.अ.वसंत फुलसिंग राठोड यांची तात्काळ तक्रारी बदली करण्यात यावी अशी वरिष्ठांकडे मागणी केली आहे.
What's Your Reaction?

