डॉ. प्रकाश आमटेंच्या हस्ते शुक्रवारी 'युवाग्राम'चे भूमिपूजन
डॉ. प्रकाश आमटेंच्या हस्ते शुक्रवारी 'युवाग्राम'चे भूमिपूजन संभाजी नगर : वयाची १८ वर्षे पूर्ण झाल्याच्या कारणाने अनाथ विद्यार्थ्यांना बेदखल न करता त्यांना रोजगारक्षम बनवून स्वतःच्या पायावर उभे करण्याच्या उद्देशाने शरणापुर येथे उभारण्यात येणा vaऱ्या आई संस्थेच्या युवाग्राम प्रकल्पाचे शुक्रवारी (दि.१७) पद्मश्री डॉ. प्रकाश आमटे व डॉ. मंदाकिनी आमटे यांच्या हस्ते भूमिपूजन होत आहे. वयाची अठरा वर्षे पूर्ण करून अनाथालयातून बाहेर पडणाऱ्या विद्यार्थ्यांनाही आधाराची गरज असते. किंबहुना या वयात ही गरज अधिकच असते. याचा गांभीर्याने विचार करत आई संस्थेचे संतोष गर्जे यांनी युवाग्राम प्रकल्प उभारण्याचा संकल्प केला. संभाजीनगर जवळील शरणापुर येथे जवळपास १०० विद्यार्थ्यांच्या क्षमतेचा हा प्रकल्प होत असून त्याचे भूमिपूजन शुक्रवारी आमटे दाम्पत्याच्या हस्ते होत आहे. प्रसिद्ध उद्योजक राम भोगले व एम आय टी चे डायरेक्टर मुनीष शर्मा यांची यावेळी प्रमुख उपस्थिती लाभणार आहे. दरम्यान डॉ. प्रकाश आमटे व डॉ. मंदाकिनी आमटे यांची प्रकट मुलाखत होणार आहे. नागरिकांनी या समारंभास मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे नम्र आवाहन संतोष गर्जे, प्रशांत देशपांडे, हरीश जाखेटे, डॉ. संदीप सिसोदे, नीलकंठ देशमुख, अंजली राईलकर, प्रीति गर्जे, जीवन थुल यांनी केले आहे. निरामय समाजाचा संकल्प करू - संतोष गर्जे शरीराच्या कोणत्याही अवयवाला इजा झाली तर संपूर्ण शरीररच अस्वस्थता अनुभवते. समाजाचेही असेच असते. आपल्या सभोवतालचा एखादा समाजघटक वेदनांनी ग्रस्त असेल तर त्याचे प्रतिबिंब कळतनकळत संपूर्ण समाज जीवनावर पडते. त्यामुळे बालग्राम, युवाग्राम व तत्सम प्रकल्पाच्या माध्यमातून निरामय समाजाचा संकल्प करण्यासाठी एकत्र येऊ असे नम्र आवाहन युवाग्राम प्रकल्पाचे संचालक संतोष गर्जे यांनी छ. संभाजीनगरवासियांना केले आहे.

1.
What's Your Reaction?






