शासकीय कर्करोग रुग्णालयात पेट स्कॅनची व्यवस्था करून ५० कोटीं निधी देऊन विविध योजनांचा लाभ द्या- डॉ. राजेंद्र दाते पाटील

शासकीय कर्करोग रुग्णालयात पेट स्कॅनची व्यवस्था करून ५० कोटीं निधी देऊन विविध योजनांचा लाभ द्या- डॉ. राजेंद्र दाते पाटील पत्रकार परिषदेत मागणी प्रतिनीधी- शासकीय कर्करोग रुग्णालय,छत्रपती संभाजीनगर येथे पेट स्कॅनची व्यवस्था करून ती आंमलात येई पर्यंत शासना च्या विविध योजनेतून ही सेवा गोर गरीब रुग्णांना मोफत उपलब्ध करणे व पेट स्कॅन कार्यान्वित करण्यासाठी किमान ५० कोटीं निधीची उपलब्धता होण्याचे आदेश द्यावेत अशी महत्वाची मागणी एक भव्य पत्रकार परिषदेत शहर विकासाचे जेष्ठ अभ्यासक व पीपल्स फोरम फॉर सोशल कॉज चे सचिव डॉ.राजेंद्र दाते पाटील यांनी केली. तत्पूर्वी त्यांनी मुख्यमंत्री यांचें कडे अशी मागणी केली असता जन आरोग्य विभागाचे प्रधान सचिव, महाराष्ट्र राज्य यांचे कडे योग्य ते आदेश देउन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी निवेदन पाठवले असल्याची माहिती त्यांनी पत्रकार परिषदेत दिली आहे. या बाबत बोलतांना त्यांनी पत्रकार परिषदेत सविस्तर निवेदन केले की,पेटस्कॅन साठी गोरगरीब रुग्ण,शासकीय कर्करोग रुग्णालय, छत्रपती संभाजीनगर येथे येतात वास्तविक पहाता जवळ पास संपुर्ण महाराष्ट्रात या अत्यावश्यक सेवेचा अभाव असल्यामुळें रुग्ण मृत्युशी झुंज देत आहेत.शासकीय कर्करोग रुग्णालय,छत्रपती संभाजीनगर येथे रुग्णाच्या पेट स्कॅन इलाज करावयाचे असेल तर या रुग्णालयात ही सुविधा नाही, हे पेट स्कॅन खाजगी रुग्णालयातुन करून आणा असे सर्रास रुग्णालया तुन सांगीतले जात असल्यामुळे गोर गरीब रुग्ण हवालदिल झाले असल्याची महत्वाची बाब डॉ.राजेंद्र दाते पाटील यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे निदर्शनास आणून दिली असता वरील प्रमाणे आदेश झाले आहेत. सदरचे पेटस्कॅन बाहेरून तपासणी करून आणण्यासाठी गोरगरीब रुग्ण अथवा त्यांचे नातेवाईक यांचें कडे पैसेच नसल्याने रुग्ण व रुग्णाचें नातेवाईक चिंताक्रांत झालेले आहेत. ही बाब फक्त एखाद्याच रुग्णाची नसून बहूसंख्यरुग्णावर ही वेळ तथा आफात आलेली आहे. पुढे बोलताना ते म्हणाले की,कॅन्सरचे शासकीय रुग्णालय छत्रपती संभाजीनगर येथे पेट स्कॅनची वाट पहावी लागणार असुन कर्करोग रुग्णालयात पेट स्कॅनची प्रतीक्षाच करावी लागत आहे. याला कारण म्हणजे सध्या शासकीय कर्करोग रुग्णालय, छत्रपती संभाजी नगर येथे या आधुनिक उपचार पद्धतीसाठी त्यासाठी आवश्यक असे न्युक्लिअर मेडिसिन तज्ज्ञ, तंत्रज्ञ, तपासणीसाठी लागणाऱ्या इतर सर्व सेवा सुविधा उपलब्ध नाहीत ज्या की उपलब्ध होणे अत्यंत महत्त्वाचे आहे असेही अभ्यासु निवेदन डॉ.राजेंद्र दाते पाटील यांनी पत्रकार परिषदेत नमूद केले आहे. पुढे बोलतांना ते म्हणाले की,सदरचे पेट स्कॅनची पद्धत ही कॅन्सरची स्टेजओळखण्यास अत्यंत महत्त्वपूर्ण मदत करते जेणे करुन अनेक रूग्ण मरणा च्या दारातून बाहेर पडतात तसेच पेटस्कॅन द्वारे कॅन्सर कोणत्या स्टेजवर आहे याचे निदान करण्यास व आवश्यक ते उपचार करण्यास महत्वाची मदत होते व ते कळण्यास मदत होते आणि त्यामुळे आवश्यक तो पुढील उपचार झाल्या नंतरही कॅन्सर किती बरा झाला, उपचाराला कसा प्रतिसाद मिळत आहे, हे देखील या तपासणीतून कळते. कॅन्सर रुग्णांना किमान एक ते चार वेळा ही तपासणी करावी लागते अशी महत्वाची बाब त्यांनी नमुद करून त्यांनी आपल्या निवेदनात हेही नमुद केले की, या सर्व सेवा सुविधा सद्य स्थितीत उपलब्ध नसल्यामुळे रुग्ण जगण्याचा लढा देत आहेत.या महत्वाच्या अशा पेट स्कॅन साठी खासगी रुग्णालयात हजारो रुपये अदा करावे लागतात.शासकीय कर्करोग रुग्णालयात येणारे रुग्ण हे गोरगरीब असतात,शासकीय कर्करोग रुग्णालयाची मोठी इमारत उपलब्ध असली तरी पेट स्कॅन ची सोय नसल्यामुळे रुग्णांच्या जिविताशी खेळ होत आहे. म्हणून पीपल्स फोरम फॉर सोशल कॉज चे सचिव व शहर विकासाचे जेष्ठ अभ्यासक डॉ.राजेंद्र दाते पाटील यांनी मागणी केली होती की, शासकीय कर्करोग रुग्णालय छत्रपती संभाजीनगर येथे पेट स्कॅन मशिन व तंत्रज्ञान येऊन ती सुरू होई पर्यंत किमान महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजनेत या तपासणीचा अती तात्काळ समावेश करून गोरगरीब कॅन्सर रुग्णांना आधार देऊन त्यांचा जीव वाचवावा,कर्करोग रुग्णालयात उपचार घेण्यासाठी सदरची पेट स्कॅन प्रकिया ही अनिवार्य बाब आहे. साधारणतः २० हजार रुपयांच्या आसपास खासगी रुग्णालयात पेट स्कॅन तपासणी साठी मोजावे लागतात.गोर गरीब रुग्णांना ही रक्कम अजिबात परवडणारी नसल्या मुळे आणि पेट स्कॅन किमान ४ ते ५ वेळेस करणे आवश्यक असते म्हणून पेट स्कॅनची प्रतीक्षाच करावी लागत आहे. पेट स्कॅन कार्यान्वित करण्या साठी व इतर सेवा सुविधा साठी किमान ५० कोटीं निधीची आवश्यकता आहे. रुग्णांच्या जीविताची काळजी घेण्यासाठी तात्काळ कार्यवाही होण्याचे आदेश आरोग्य व अर्थ विभागास व्हावेत अशी जोरकस मागणी पीपल्स फोरम फॉर सोशल कॉज चे सचिव व शहर विकासाचे जेष्ठ अभ्यासक डॉ.राजेंद्र दाते पाटील यांनी मुख्मंत्र्यांकडे केली असता त्यांनी वरील प्रमाणे आदेश दिले आहेत. या पत्रकार परिषदेस डॉ राजेंद्र दाते पाटील,प्रा.मनोहर लोंढे, प्रा. डॉ मच्छिंद्र गोर्डे, विजय गुड्डू निकाळजे आदी उपस्थित होते.

Apr 9, 2025 - 22:11
 0
1 / 1

1.

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow

Er.M.A. Shakeel Senior Journalist,Social and Political activist Sportsman,Singer.District VicePresident Human Right Council of India.