कन्नड तालुका पत्रकार संघाच्या अध्यक्षपदी विठ्ठल शिरसे तर सचिवपदी मुजीब खान यांची निवड
कन्नड तालुका पत्रकार संघाच्या अध्यक्षपदी विठ्ठल शिरसे तर सचिवपदी मुजीब खान यांची निवड कन्नड/प्रतिनीधी. : कन्नड तालुका पत्रकार संघाच्या वतीने आज ६ जानेवारी रोजी आद्य पत्रकार 'दर्पणकार 'श्री बाळशास्त्री जांभेकर यांना अभिवादन करत दर्पणदिन साजरा करण्यात आला. सहकारमहर्षी बाळासाहेब पवार सार्वजनिक वाचनालयात जेष्ठ पत्रकार डॉ. यशवंत पवार यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झालेल्या, या कार्यक्रमात पत्रकार संघाची नूतन कार्यकारिणी निवडण्यात आली. यात पत्रकार संघाचा अध्यक्षपदी विठ्ठल शिरसे(दै.प्रसार)यांची तर सचिवपदी मुजीब खान (दै. कॉस्मो एक्सप्रेस) यांची बिनविरोध निवड करण्यात आली. पत्रकार संघाच्या उर्वरित कार्यकारिणीत उपाध्यक्ष - डी. यशवंत पवार ( दै.शूर मराठा), कार्याध्यक्ष - प्रा.डॉ. शिवाजी हुसे ( संपादक त्रैमासिक तिफण), सहसचिव - किशोर क्षिरसागर ( दै. दिव्य मराठी) यांच्यासह अभिषेक देशमुख,आर.एस. पवार, मधुभाऊ महाले ( संपादक दै. शिवणातीर) शेख अकीब, संजय जाधव यांची सदस्यपदी निवड करण्यात आली आहे. कार्यक्रमाचा सुरुवातीस सहकारमहर्षी बाळासाहेब पवार, ज्येष्ठ पत्रकार स्व. सुरेश केवट आणि आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. या वेळी डॉ. यशवंत पवार यांनी मनोगत व्यक्त केले.कार्यक्रमाचे प्रास्ताविक तिफणकार डॉ. शिवाजी हुसे यांनी केले.सावित्रीबाई फुले कन्या विद्यालयाचे प्राचार्य संजय जाधव यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन करून उपस्थितांचे आभार मानले. कार्यक्रमास बाळासाहेब पवार सार्वजनिक वाचनालयाचे सचिव रामकृष्ण पवार, संजय केवट यांच्यासह इतरांची उपस्थिती होती.

1. कन्नड तालुका पत्रकार संघाच्या अध्यक्षपदी विठ्ठल शिरसे तर सचिवपदी मुजीब खान यांची निवड
What's Your Reaction?






